होमगार्ड कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 04:16 PM2020-03-03T16:16:19+5:302020-03-03T16:16:24+5:30

मानधनासाठी नेहमीच दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांचे आर्थिक नियोजन कोलडले आहे.

Homeuards employees await honors | होमगार्ड कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा

होमगार्ड कर्मचाऱ्यांना मानधनाची प्रतीक्षा

googlenewsNext

- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाºया गृह रक्षक दलाच्या जवानांची स्थिती फारशी चांगली नाही. मानधनासाठी नेहमीच दीर्घ काळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांचे आर्थिक नियोजन कोलडले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात गृह रक्षक दलाचे सुमारे १६०० जवान आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांचे योगदान मोठे असते. पोलीसांसोबत जीवाची पर्वा न करता गृह रक्षक दलाच्या जवानांना कर्तव्य पार पाडावे लागते. सध्या ६७० रूपये प्रतिदिन या प्रमाणे त्यांना मानधन दिले जाते. वर्षभरात जास्तीत जास्त ९० ते १०० दिवस कर्तव्यावर हजर राहण्याची संधी त्यांना मिळते. त्यामुळे इतर दिवस बेरोजगार राहण्याचीही वेळही गृह रक्षक दलाच्या जवानांवर येते. आधीच वर्षभरात केवळ ९० दिवस काम आणि त्यातही मानधन वेळेवर मिळत नाही; यामुळे संसाराचा गाडा कसा चालवावा, हा प्रश्न गृह रक्षक दलाच्या जवानांसमोर आहे. वर्षभरात साधारणपणे गणपती, नवरात्रोत्सव, जगदंबा उत्सव, ६ डिसेंबर, १४ एप्रिल तसेच वरिष्ठांच्या आदेशानूसार तशी परिस्थिती उदभवल्यास जवानांना काम मिळते.
कामाची अशी परिस्थीती असताना मानधनही लवकर मिळत नसल्याने जवानांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे व गृहरक्षक दलाच्या जवानांच्या समस्या सोडवाव्या, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Homeuards employees await honors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.