सर्वच क्षेत्राला प्रामाणिक व सज्जन व्यक्तिंची आवश्यकता- आमदार हर्षवर्धन सपकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 01:55 PM2018-07-04T13:55:36+5:302018-07-04T13:57:48+5:30
बुलडाणा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुलडाण्यातील कार्यकर्ते शाहिणा पठाण आणि ना. है. पठाण यांनी आपआपल्या क्षेत्रात माणसे जोडण्याचे जे काम केले आहे, ते खरोखरच माणुसकीचे आहे. अशा प्रामाणिक व सज्जन व्यक्तींची सर्वच क्षेत्रात गरज असल्याचे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी काढले.
बुलडाणा : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुलडाण्यातील कार्यकर्ते शाहिणा पठाण आणि ना. है. पठाण यांनी आपआपल्या क्षेत्रात माणसे जोडण्याचे जे काम केले आहे, ते खरोखरच माणुसकीचे आहे. अशा प्रामाणिक व सज्जन व्यक्तींची सर्वच क्षेत्रात गरज असल्याचे प्रतिपादन आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी काढले. प्रगती सार्वजनिक वाचनालयात रविवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने महाराष्ट्र अंनिसचे बुलडाणा जिल्ह्याचे कार्यकर्ते शाहिणा पठाण व ना. है. पठाण यांच्या सत्काराचे आयोजन बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सामाजिक कार्यकर्त्या शाहिणा पठाण व ना.है. पठाण यांच्या आजवरच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा अरविंद शिंगाडे व नरेंद्र लांजेवार यांनी उपस्थितांना करून दिला. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन या मान्यवरांचा औचित्यपूर्ण सत्कार करण्यात आला. बुलडाणा कौमी एकता मंचच्या वतीने डॉ. गणेश गायकवाड यांनी तसेच डॉ. विजया काकडे यांनी शाहिणा पठाण व ना.है.पठाण यांचा सत्कार केला. महाराष्ट्र अंनिसच्या वतीने प्रा.डॉ.संतोष आंबेकर, पंजाबराव गायकवाड, अरविंद शिंगाडे, प्रदीप हिवाळे यांनी शाहिणा पठाण व पठाण सरांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झालीत. प्रा.ई.जी.धांडे यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सांगता झाली. पुरूषोत्तम गणगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास डॉ. नंदिनी रिंढे, श्रीमती ज्योती फिस्के, डॉ. विजया काकडे, प्रा. कल्पना माने, डॉ. मंजुषा खोब्रागडे, प्रा.मृणालीनी सपकाळ, प्रा.रविंद्र साळवे, प्रा. अरविंद रिंढे, निलेश चिंचोले, निलकुमार बंगाळे, प्रदीप हिवाळे, मुकुंद पालवे, गणेश देशमुख, सुमीत चिंचोळकर, रामदास वाघमारे, गजानन अंभोरे, दिपक चित्ते आदीउपस्थित होते.