हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित आराेपी तरुणीची  कारागृहात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 11:28 AM2021-01-05T11:28:56+5:302021-01-05T11:32:06+5:30

Honey trap suspect girl commits suicide संशयित २१ वर्षीय तरुणीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Honey trap suspect girl commits suicide in jail | हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित आराेपी तरुणीची  कारागृहात आत्महत्या

हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित आराेपी तरुणीची  कारागृहात आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्देअकियाबी मुनाब खाँ (२१, रा. धामणगाव बढे) असे या युवतीचे नाव आहे.अकियाबी मुनाब खाॅं हिला न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली होती. स्वच्छतागृहात जाऊन शॉवरला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : हनी ट्रॅप प्रकरणी तात्पुरत्या कारागृहात असलेल्या संशयित २१ वर्षीय तरुणीने ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ४ जानेवारी राेजी सायंकाळी उघडकीस आली.  अकियाबी मुनाब खाँ (२१, रा. धामणगाव बढे) असे या युवतीचे नाव आहे. बालसुधारगृहातील दाेन बालकांनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली हाेती. त्यानंतर ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
जिल्हा कारागृहाच्या बाजूलाच असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या सिंहगड या इमारतीत तात्पुरते कारागृह उभारण्यात आले आहे. तिथे कोरोनामुळे आधी १४ दिवस आरोपींना ठेवण्यात येते. रायपूर पाेलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल असल्याप्रकरणी अकियाबी मुनाब खाॅं हिला न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली होती. तिला तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले हाेते. साेमवारी सायंकाळी तिने स्वच्छतागृहात जाऊन शॉवरला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Honey trap suspect girl commits suicide in jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.