बुलडाणा जिल्ह्यातील गाव कारभार्यांचा ‘लोकमत’तर्फे सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:23 AM2018-02-21T01:23:10+5:302018-02-21T01:27:36+5:30
खामगाव: ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणार्या बुलडाणा जिल्ह्यातील १३ सरपंचांना मंगळवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत’ सरपंच अँवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. खामगाव येथील जलंब रोडवरील पॉलिटेक्निक मैदानावर २0 फेब्रुवारी रोजी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ वितरण सोहळा थाटात पार पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देत गावगाड्याचा कारभार करणार्या बुलडाणा जिल्ह्यातील १३ सरपंचांना मंगळवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत’ सरपंच अँवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आले. खामगाव येथील जलंब रोडवरील पॉलिटेक्निक मैदानावर २0 फेब्रुवारी रोजी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ वितरण सोहळा थाटात पार पडला.
गावागावांतील विकासकामांची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभार्यांना बीकेटी टायर्स प्रस्तुत ‘लोकमत’ सरपंच अँवॉर्ड्स २0१८ ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. पतंजली आयुर्वेद हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर महिंद्रा ट्रॅक्टर्स हे सहप्रायोजक होते. यावेळी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तसेच बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर, खामगावच्या नगराध्यक्ष अनिता डवरे, पं.स. सभापती ऊर्मिला शरदचंद्र गायकी, जि.प. सभापती गोपाल गव्हाळे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, बीकेटी टायर्सचे एरिया मॅनेजर जुबेर शेख व नेत्रानंद अंबाडेकर, महिंद्रा ट्रॅक्टर्सचे व्यवस्थापक संभाजी बढे, महिंद्रा बुलडाणा जिल्हय़ाचे डिलर सुदाम जाधव, लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले, लोकमत अकोला आवृत्तीचे सहायक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पहिल्या वर्षी केलेल्या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. यासाठी ३00 हून अधिक प्रस्ताव सादर करण्यात आले होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करून ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल बाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रास्ताविक अकोला ‘लोकमत’चे निवासी संपादक रवी टाले यांनी केले.
गावपातळीवरील उत्कृष्ट कामांचा सत्कार - जुबेर शेख
बीकेटी टायर्सचे एरिया मॅनेजर (अँग्रीसेल) महाराष्ट्र जुबेर शेख म्हणाले, लोकमत सरपंच अवॉर्ड्स म्हणजे गावपातळीवर उत्कृष्ट कार्य करणार्या लोकांचा सत्कार होय. यावेळी त्यांनी बीकेटी टायर्स या कंपनीबाबत माहिती देताना सांगितले की, ही कंपनी जागतिक स्तरावर कार्य करते. १३0 देशांना टायर्स निर्यात करते. जगातील सर्व प्रकारच्या ट्रॅक्टर्सचे टायर कंपनीतर्फे बनवले जातात. खास महाराष्ट्रातील माती लक्षात घेऊन कमांडर टायर्स तयार केले आहे. हे शेतकर्यांसाठी अतिशय उपयोगाचे आहे. या टायर्सवर विशेष गॅरंटीसुद्धा देण्यात आलेली आहे. यावेळी त्यांनी एव्हीच्या माध्यमातून कंपनीच्या टायर्सचे महत्त्व पटवून सांगितले.