आदर्श पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2017 04:49 PM2017-04-01T16:49:48+5:302017-04-01T16:49:48+5:30
बुलडाणा: १३ तालुक्यातील १३ आदर्श ग्रामसेवकांचा जिल्हा क्रीडा संकुल बुलडाणा येथे मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
बुलडाणा: १३ तालुक्यातील १३ आदर्श ग्रामसेवकांचा जिल्हा क्रीडा संकुल बुलडाणा येथे मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.
यावेळी शासनाच्या विविध योजना राबवून शासकीय कामाची योग्य अंमलबजावणी केल्या बाबत सन २०१३-१४ ते २०१५-१६ या वर्षातील जिल्हा परिषद बुलडाणामधील आदर्श ग्रामसेवकांना पुरस्कार वितरण व सपत्नीक सत्कार जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई शिवचंद्र तायडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. जि. प. उपाध्यक्ष मंगलाताई संतोष रायपुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसह जिल्हाभरातील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमात ममता भागवत पाटील, पंचायत समिती बुलडाणा, समाधान लक्ष्मण पडघान पं. स. चिखली, सुधाकर आश्रुजी नागरे
पं.स. देऊळगाव राजा, अविनाश बाबुराव नागरे पं. स. सिंदखेड राजा, विजय रामकृष्ण बार्डेकर पं. स. लोणार, पुरूषोत्तम आत्माराम बोराडे पं.स. खामगाव, वंदना मनिष रोडे पं. स. शेगाव, गिरधर अर्जुन खोने पं. स. संग्रामपूर, धिरज गणेशराव मारोडे पं. स. जळगाव जामोद, संदिप नारायण धंदर पं. स. नांदुरा, शितल सिद्धेश्वर खांदे, पं. स. मलकापूर व निवृत्ती पांडुरंग डाखोरकर पं. स. मोताळा या ग्रामसेवकांना २०१६-१७ या वर्षाकरीता आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जि. प. अध्यक्षा उमाताई शिवचंद्र तायडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांसह जि. प. सदस्या जयश्री शेळके, डि. एस. लहाने, निरंजन वाढे, उज्वला मोरे, मुख्यकार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेमाने, प्रकल्प संचालक राजेश लोखंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा. पं. चंदनसिंग राजपूत, बुलडाणा पं. स. सभापती,राज्य सरचिटणीस ग्रामसेवक युनियनचे प्रशांत जामोदे, बुलडाणा ग्रामसेवक युनियन अध्यक्ष विठठ्ल आर. चव्हाण, जि. प. कर्मचारी महासंघाचे अशोक काळे आदी उपस्थित होते.