कन्येला जन्म देणार्या मातेचा करणार सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:25 AM2017-08-15T00:25:23+5:302017-08-15T00:28:27+5:30
मेहकर: ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा उपक्रम शासनाकडून व विविध सामाजिक संघटनांकडून राबविण्यात येत आहे. तर स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून अँस्ट्रल फाउंडेशन शाखा मेहकरच्यावतीने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जी माता कन्येला जन्म देईल त्या मातेचा साडी व चोळी देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अलीकडच्या काळामध्ये स्त्री भ्रूणहत्या, महिलांवर अत्याचार, अन्याय असे प्रकार वाढत आहेत. स्त्री भ्रूणहत्या थांबविण्यासाठी शासन युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. तर अँस्ट्रल फाउंडेशन औरंगाबाद शाखा मेहकरच्यावतीने १५ ऑगस्टला एक आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे. या दिवशी जी माता कन्येला जन्म देईल, त्या मातेला साडी, चोळी, मुलीला ड्रेस देऊन मायलेकीचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी स्वातंत्र्यदिनी जी माता कन्येला जन्म देईल त्याची माहिती अँस्ट्रल फाउंडेशनचे कार्यालय रामदास वेटाळ, चिखली रोड मेहकर या ठिकाणी द्यावी, असे आवाहन कर्मचारी संजय लोढे, जयश्री पाटील, आशा नखाते, शिवाणी मैंद, वंदना सातपुते यांनी केले आहे.