महिलांना सन्मानाची वागणूक द्यावी - अॅड. जयश्री शेळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 03:22 PM2018-03-26T15:22:33+5:302018-03-26T15:22:33+5:30
बुलडाणा : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. शेतीमध्ये राबणारे ९० टक्के हात महिलांचे आहेत. समाजात वावरताना स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्यावी, असे मत जि.प.सदस्या अॅड. जयश्री शेळके यांनी व्यक्त केले.
बुलडाणा : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. शेतीमध्ये राबणारे ९० टक्के हात महिलांचे आहेत. समाजात वावरताना स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्यावी, असे मत जि.प.सदस्या अॅड. जयश्री शेळके यांनी व्यक्त केले. येथील कृषि विज्ञान केंद्रात नेहरू युवा केंद्राव्दारे रविवारला आयोजित राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या की, संतांची परंपरा सांगणाºया महाराष्ट्रात महिला आत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. स्त्रीयांना सुध्दा आत्मसन्मान आहे. त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे. त्यांचा सन्मान केला पाहिजे हे सगळ्यांनी आचरणात आणणे आवश्यक आहे. याकरीता जनजागृती व प्रयत्न करण्याची गरज आहे. समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.हरिश साखरे यांनी युवकांना गावाच्या विकासासाठी वाहून घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात जिल्हा युवा समन्वयक हरिहर जिराफे यांनी कौशल्य विकास व रोजगाराची स्थिती या विषयावर चर्चासत्र घेतले. तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या डॉ. जे.एस.गवई यांनी दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयाच्या कार्यक्रमाची माहिती दिली. दुपारच्या सत्रात प्रा.डॉ.अविनाश गेडाम यांनी युवा वर्गाची वैशिष्टे युवा अवस्था यावर मार्गदर्शन केले. अनिता जिराफे यांनी विविध गीत व खेळाच्या माध्यमातून शिबिरार्थींना सामाजिक विषयांबाबत प्रबोधन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी धनंजय चाफेकर, ममता वाघमारे, कांचन निस्वादे, तेजस्विनी निबोरकर, दीपक भाकरे यांनी परिश्रम घेतले.