मुलीला जन्म देणा-या पालकांचा होणार सन्मान

By admin | Published: July 10, 2017 08:11 PM2017-07-10T20:11:10+5:302017-07-10T20:11:10+5:30

लोणार : जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याच्या मुलींना जन्म देण्या-या पालकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Honor will be given to parents giving birth to a girl child | मुलीला जन्म देणा-या पालकांचा होणार सन्मान

मुलीला जन्म देणा-या पालकांचा होणार सन्मान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून  मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याच्या मुलींना जन्म देण्या-या पालकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली व तालुका स्तरीय पदाधिकारी,अधिकारी यांचे सहकार्याने मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांना भेटी व मार्गदर्शन देऊन १९३४ लायक जोडप्यांना आरोग्य विभागा मार्फत जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वाक्षरी चे बेटी बचाव , बेटी पढाव आवाहन पत्र तसेच नवे पर्व ,नवी दिशा , नवे संकल्प असलेले स्टिकर्स घरोघरी लावण्याचे अभियान ११ ते २६ जुलै राबविण्यात येणार आहे.
मुलींच्या जन्मदरात होत असेलेली घट हा चिंतेचा विषय ठरत आहे. मागील काही वर्षांतील आकडेवारीवरूनच हि गंभीर समस्या समोर आली आहे. ही घट मागील दोन वर्षांत झाली अशातलाही भाग नाही. स्वातंत्र्यानंतर आपण याबाबतचा बारकाईने अभ्यास केला तर सुरुवातीपासूनच मुलींच्या जन्मदारात घट होतच आहे,पण समाजात याबाबत जागरूकता राहिली असती तर आज मुलींच्या जन्मदराबाबत जे काही भयाण चित्र दिसत आहे ते दिसले नसते. लोकसंख्या वाढीस आळा घालणे हे एकमेव उद्दिष्ट समोर ठेवून शासन चालत होते. लोकसंख्या वाढीला नियंत्रण करणे हेच एकमेव उद्दिष्ट शासनाने ठेवले यामुळे मुलींच्या जन्मदराकडे तितकेसे लक्ष गेले नाही. यामुळे मुलगी जन्माला आल्यावर मारून टाकणे, दुर्लक्ष करणे किंवा गर्भलिंग चाचणी करून जन्माआधीच तिची यात्रा संपविणे हे सर्रास सुरू होते. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी सरकारने अनेक योजना राबविल्या त्यात एकात्मिक बाल विकास योजना ही देशातील सर्वात मोठी योजना आहे. १८ हजार कोटींहून अधिक खर्च या योजनेत केला जातो. या योजनेच्या माध्यमातून गर्भार माता, स्तनदा माता, ० ते ६ वयोगटांतील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्याकडे अधिक लक्ष दिले जाते. तरीही पाहिजे तसे मुलींचा जन्मदर वाढलेले दिसून येत नाही. यामुळे ११ जुलै जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून  मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली व तालुका स्तरीय पदाधिकारी,अधिकारी यांचे सहकार्याने मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांना भेटी व मार्गदर्शन देऊन १९३४ लायक जोडप्यांना आरोग्य विभागा मार्फत जिल्हाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे स्वाक्षरी चे बेटी बचाव , बेटी पढाव आवाहन पत्र तसेच नवे पर्व ,नवी दिशा , नवे संकल्प असलेले स्टिकर्स घरोघरी लावण्याचे अभियान ११ ते २६ जुलै राबविण्यात येणार आहे.              

११ ते २६ जुलै दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानात तालुका प्रशासनातील प्रमुख अधिकारी यांच्यासह आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका,मदतनीस व आरोग्य कर्मचारी हि सहभागी होणार आहेत.या अभियानातून मुलींचा जन्म दर वाढण्यास नक्कीच मदत होईल.
- डॉ.अनंत पबितवार , तालुका आरोग्य अधिकारी ,लोणार.

 

Web Title: Honor will be given to parents giving birth to a girl child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.