आहार देण्यास आशा स्वयंसेविकांचा नकार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:57 PM2017-09-24T23:57:10+5:302017-09-24T23:57:19+5:30
हिवराआश्रम : राज्यातील अंगणवाडी सेविका व मद तनिसांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे अंगणवाडी केंद्रातील बालकांसह गर्भवती व स्तनदा मातांना दिला जाणारा पोषण आहार पुरवठा हा ११ सप्टेंबरपासून बंद आहे. या पोषण आहाराचे वितरण हे आशा स्वयंसेविकांनी करावे, अशा सूचना असतानाही त्यांनीही स्पष्ट नकार दिल्यामुळे यांच्या तू-तू, मै-मै च्या वादात बालकांसह गरोदर व स्तनदा महिलांचा पोषण आहार अडकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात वाढ द्यावी, या मागणीसह इतर मागण्याकरिता ११ सप्टेंबरपासून राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस बेमुदत संपावर आहेत. जोपर्यंत मानधनवाढीचा निर्णय सरकार घेत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. राज्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रातील सहा वर्षे वयापर्यंतची बालके, गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या किमान सेवा जसे आहार पोषण सेवा कोणत्याही कारणास्तव जर खंडित होण्याची स्थिती उद्भवल्यास ही सेवा तात्पुरत्या स्वरूपात व कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत विनाखंडित सुरळीत चालू ठेवण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत आरोग्य विभागाच्या स्थानिक आशा कर्मचार्यांना अंगणवाडीतील आहार पुरवठा सुरू करण्यासंबंधी सूचना असतानाही या आशांनीही स्पष्ट नकार दिल्याने या अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वादात बालकांसह स्तनदा, गरोदर माता व किशोरी मुली यांचा पोषण आहार अडकला आहे.