अंगणवाडीसेविकांची कामे करण्यास आशा स्वयंसेविकांचा नकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 08:21 PM2017-10-03T20:21:48+5:302017-10-03T20:22:15+5:30

बुलडाणा:  अंगणवाडीसेविकांनी संप पुकारल्यामुळे अंगणवाडीतील मुले पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रत्येक  गावात एकात्मिक बालविकास समिती नेमून आशा स्वयंसेविकांना पोषण आहार शिजविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, आशा स्वयंसेविकांनी पोषण आहार शिजविण्यास नकार दिला आहे. 

Hope to volunteer for Anganwadi workers | अंगणवाडीसेविकांची कामे करण्यास आशा स्वयंसेविकांचा नकार 

अंगणवाडीसेविकांची कामे करण्यास आशा स्वयंसेविकांचा नकार 

Next
ठळक मुद्देअंगणवाडीतील मुले पोषण आहारापासून वंचित बालविकास समिती नेमून पोषण आहार शिजविण्याचे आदेश 

जिल्हा परिषदसमोर मोर्चा 
बुलडाणा:  अंगणवाडीसेविकांनी संप पुकारल्यामुळे अंगणवाडीतील मुले पोषण आहारापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे प्रत्येक  गावात एकात्मिक बालविकास समिती नेमून आशा स्वयंसेविकांना पोषण आहार शिजविण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, आशा स्वयंसेविकांनी पोषण आहार शिजविण्यास नकार दिला आहे. 
जिल्हाभरातील ग्रामीण व शहरी भागात जनतेच्या आरोग्य संवर्धनाचे काम करणाºया आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर ३ आॅक्टोबर रोजी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात जिल्हाभरातून आलेल्या शेकडो आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या. अंगणवाडीसेविकांनी संप पुकाल्यामुळे शासनाने एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाला प्रत्येक गावात आशा स्वयंसेविकांकडून अंगणवाडीत पोषण आहार शिजवून मुलांना वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याला विरोध होत आहे.  
सीटू प्रणित आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाभरातून आलेल्या शेकडो आशा वर्कर्स व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, शहरी व ग्रामीण जनतेचे आरोग्य संवर्धन करण्याचे काम आशा वर्कर्स व गटप्रवर्तक करीत असतात. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारचे मानधन दिल्या जात नाही. तसेच त्यांना केसेसनिहाय दिला जाणार अत्यल्प मोबदलादेखील पाच-पाच, सहा-सहा महिने मिळत नाही. त्यामुळे आशा वर्कर्सना मोठ्या त्रासाला समोरे जावे लागते. आशा वर्कर्सना १० हजार व गट प्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, आशा वर्कर्सना वजनकाटे, झोळी, तापमापी खरेदी त्यांच्याच पैशाने खरेदी करण्याचे सांगितले जात आहे. हा आशा वर्कर्सवर मोठा अन्याय आहे. जिल्ह्यातील अनेक गटप्रवर्तकांना पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत, ते आदेश त्वरित देण्यात यावेत. एप्रिलपासून थकीत असलेला आशा वर्कर्सचा मोबदला तात्काळ देण्यात यावा, तसेच गटप्रवर्तकांचे थकीत मान तात्काळ अदा करण्या यावे. गटप्रवर्तकांनी गावांना भेटी दिल्याबाबत त्या गावातील नागरिकाची सही घेण्याचा आदेश रद्द करण्यात यावा. नगरपालिके अंतर्गत काम करणा-या शहरी आशा वर्कर्सना गणवेश व ओळखपत्र द्यावेत. यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात वर्षा शेळके, विजया ठाकरे, ज्योती ठेंग, ललीता बोदडे, मंदा म्हसाळ, अरुणा रत्नपारखी, मंगला गव्हले, ऊर्मिला माठे, गोदावरी खंडेराव, इंदिरा इंगळे, सुरेखा ढगे, चंदा झोपे, नलीनी गोरे, प्रमोदिनी वळसे, अनिता कदम, संतोषी नागरे, प्रतिभा बाणाईत, नीता कायंदे यांच्यासह मोठ्या संख्येने आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सहभागी झाल्या होत्या.
 

Web Title: Hope to volunteer for Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.