‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ गेल्यानंतर अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:38 AM2021-05-25T04:38:18+5:302021-05-25T04:38:18+5:30

बुलडाणा : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हवामानाची माहिती, शेतीविषयी मार्गदर्शन प्राप्त व्हावे याकरिता कृषी विभागाने किसान ॲप सुरू केले आहे. ...

Horses behind the ‘Kisan App’ show; Alert after the storm! | ‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ गेल्यानंतर अलर्ट!

‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ गेल्यानंतर अलर्ट!

googlenewsNext

बुलडाणा : शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हवामानाची माहिती, शेतीविषयी मार्गदर्शन प्राप्त व्हावे याकरिता कृषी विभागाने किसान ॲप सुरू केले आहे. त्याचा काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदाही होतो; परंतु काही दिवसांपासून शेतकऱ्यांना वादळ-वारे येऊन गेल्यानंतर अलर्ट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होत आहे.

किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती, पीकपाणी, पिकांवरील रोगराई, त्यासाठी नियोजन आदी माहितीचे संदेश दिले जातात. ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते; परंतु गेल्या काही दिवसांपासून या ॲपद्वारे दिले जाणारे संदेश दोन- तीन दिवस उशिरा मिळत आहेत. त्यामुळे हे ॲप नावापुरतेच आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वादळ गेल्यानंतर अलर्ट मिळाल्याचे समोर आले आहे.

किसान ॲपवर काय मिळते माहिती?

ॲपवरून शेतकऱ्यांना कृषी हवामानविषयक माहिती मोबाईलवर पाठवून उपयुक्त सल्ले देण्यात येतात.

जिल्हा परिसरातील कृषी निविष्ठा व्यापारी, विक्री केंद्र यांची माहिती देण्यात येते.

जिल्ह्यातील सर्व बाजार समितींचे बाजारभाव देण्यात येतात. त्यामुळे दर माहिती करणे सोयीस्कर होते.

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पीक संरक्षण व तज्ज्ञ सल्ला याबाबत माहिती देण्यात येते.

अपडेट वेळेत मिळावे...

हवामान, वातावरणात होणारे बदलाचे अपडेट वेळेत मिळावेत. त्यामुळे शेतीचे नियोजन करण्यास सोयीस्कर होईल.

बाजारभाव दररोज अपडेट झाल्यास माल विक्रीसाठी नेता येईल, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही.

पीक संरक्षण सल्ला वारंवार अपडेट करावा, बंदी असलेली कीटकनाशके कळतील.

फायदा कमी, डोकेदुखी जास्त

हवामान बदलात सतर्कता महत्त्वाची आहे. वेळोवेळी वातावरणाचे संदेश मिळाल्यास पिकांची निगा राखण्यास फायदेशीर ठरते; परंतु गेल्या काही दिवसांपासून या ॲपच्या माध्यमातून माहिती अपडेट करण्यात येत नसल्याने अडचणी येत आहेत.

- किसनराव वानखडे, शेतकरी

पूर्वी पोस्टातून येणारी तार (टेलिग्राम), पत्र, नोकरीचा कॉल हे तारीख निघून गेल्यावर मिळाल्याचे अनेकांना ऐकिवात आहे. त्यास किसान ॲपच्या संदेशामुळे उजाळा मिळत आहे. जूनपासून पावसाळा सुरू होत आहे. आगामी काळात तरी किसान ॲपवरून दिले जाणारे संदेश, सावधानतेचे इशारे हे किमान एक-दोन दिवस अगोदर मिळावेत.

संताेष जाधव, शेतकरी

किसान ॲपच्या माध्यमातून मिळणारे संदेश शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे शेती करताना चांगला उपयोग होतो. गेल्या काही दिवसांपासून येणारे संदेश उशिरा येत आहेत. त्यामुळे वरातीमागून घोडे असा प्रकार घडत आहे. पूर्वीप्रमाणे हे संदेश यावेत.

- संजय इंगळे, शेतकरी.

Web Title: Horses behind the ‘Kisan App’ show; Alert after the storm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.