खडकाळ जमिनीवर फुलवली डाळिंबाची फळबाग
By admin | Published: November 17, 2014 12:39 AM2014-11-17T00:39:25+5:302014-11-17T00:39:25+5:30
घामाचे मोती : खामगाव तालुक्यातील युवकाने जिद्दीने फुलविली फळशेती.
अनिल गवई /खामगाव (बुलडाणा)
जिद्द, परिश्रम आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या जोरावर तालुक्यातील एका लहानशा खेड्यातील युवकाने खडकाळ जमिनीत ह्यघामाह्णची बाग फुलविली. त्याची मेहनत आता रंगू लागली असून, दीड एकर शेतीतील डाळिंबांना आता बहर येऊ लागला आहे. डाळिंबासोबतच बोरीनेही कात टाकल्याने खडतर परिश्रमातून ह्यगोडह्ण फळांची अपेक्षा त्याला आहे.
खामगाव शहरापासून १५-२0 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरखेड या खेड्यातील तानाजी शिंगाडे या युवकाची वडिलोपाजिर्त काही एकर शेती आहे. गावालगत दक्षिणेकडे असलेल्या खडकाळ शेतीतून उत्पन्न निघेनासे झाल्यामुळे त्याच्या वडिलांसह भावांनीही शेळी-मेंढी आणि गुरे पालनाच्या पारंपरिक व्यवसायालाच महत्त्व दिले. जवळ असलेल्या दुसर्या सुपीक जमिनीतून पीक घ्यायचे, शेळी-मेढी आणि जनावरे पालनातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा अशीच कुटुंबाची दिनचर्या झाली. दरम्यान, हाती फारसे लागत नसल्यामुळे तानाजीने खडकाळ जमिनीकडे लक्ष केंद्रित केले. वडिलांच्या शेळी- मेंढी पालनाच्या व्यवसायात हातभार लावण्यासोबतच खडकाळ जमिनीत शेती करण्याचा संकल्प केला. गेल्या दहा-बारा महिन्यांपासून या शेतीच्या मशागतीत गुंतला. गावालगतच्या दीड एकर शेतीत त्याने दोन फूट रुंद आणि दोन फूट लांबीचे तीनशे खड्डे खोदले. या खड्यांमध्ये बैलगाडीच्या साहाय्याने दुसर्या शेतातील सुपीक माती आणि जनावरांचे शेणखत टाकले. या खडकाळ जमिनीत टाकलेल्या माती आणि शेणखतावरून एक पावसाळा जाऊ दिला. त्यानंतर गेल्या ९-१0 महिन्यांपूर्वी या शेतीत अडीचशे डाळिंबाची आणि ५0 बोरीची रोपे लावली. या रोपांची गेल्या अनेक महिन्यांपासून जिवापाड काळजी घेतली. काही डाळिंबाची झाडे टोंगळ्यापेक्षा मोठी झाल्याने काही दिवसांमध्ये या झाडांना बहर येण्याची आशा त्याला आहे. त्यापासून शाश्वत उत्पन्न हाती लागण्याचे समाधान त्याच्या चेहर्यावर दिसत आहे.