संततधार पावसामुळे खामगावात घर कोसळले, दीड लाख रूपयांचे नुकसान
By अनिल गवई | Published: September 9, 2023 03:36 PM2023-09-09T15:36:21+5:302023-09-09T15:36:37+5:30
नाथ प्लॉट भागातील घटना
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव, (जि. बुलढाणा) : संततधार पावसामुळे स्थानिक नाथ प्लॉट भागातील एक कच्चे घर कोसळले. ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजता दरम्यान घडली. यात दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खामगाव शहरातील जलंब नाका, नाथ प्लॉट भागातील केशव भांबेरे यांचे कुडामातीचे असलेले कच्चे घर कोसळले. या घटनेत कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी, भांबेरे यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. घरातील साहित्य आणि गृहपयोगी सामान असे दीड लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे. प्रशासनाकडून घटनास्थळाचे स्थळ निरिक्षण व पंचनामा करण्यात आला.