बुलढाण्यात घराला आग, ६० हजारांचे नुकसान
By ब्रह्मानंद जाधव | Published: March 10, 2023 06:43 PM2023-03-10T18:43:57+5:302023-03-10T18:44:27+5:30
मलकापूर पांग्रा : झोटिंगा येथे घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजे दरम्यान ...
मलकापूर पांग्रा : झोटिंगा येथे घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजे दरम्यान घडली. या आगीमुळे एकूण ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. झोटिंगा येथील दीपक बाजीराव सानप हे सकाळी मुलांना शाळेत सोडण्याकरिता घरातून निघून गेले. त्यानंतर पत्नी व आई शेतात निघून गेल्या. दरम्यान, घराला अचानक आग लागली.
हा प्रकार लक्षात येताच घराशेजारील नागरिकांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरातील सोपासेट, टीव्ही, खुर्ची व इतर साहित्य असे जळून खाक झाले होते. यामध्ये एकूण ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी जे. आर. राठोड व एस. एस. निकम यांनी पंचनामा केला. यातील आवश्यक असलेले साहित्य जळून खाक झाल्याने दीपक सानप यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. याप्रकरणी तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.