घराला आग; दोन लाखांचे नुकसान
By admin | Published: May 25, 2017 12:33 AM2017-05-25T00:33:42+5:302017-05-25T00:33:42+5:30
मोताळा : आडविहीर येथे २४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता गावातील रहिवासी मधुकर विष्णू पाटील यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा : तालुक्यातील मुख्यालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या आडविहीर येथे २४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता गावातील रहिवासी मधुकर विष्णू पाटील यांच्या राहत्या घराला अचानक आग लागली.
आडविहीर येथील मधुकर विष्णू पाटील बरेच वर्षांपासून रहिवासी असून, गट नं.१४० मधील त्यांच्या घराला अचानक आग लागल्याने एकूण दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मधुकर विष्णू पाटील यांचे घर अचानक जळाल्याने ते आपल्या हक्काच्या निवाऱ्यापासून वंचित झाले आहेत. अचानक लागलेल्या आगीमध्ये मधुकर पाटील यांच्या घरातील कांदे, सोयाबीन, उडीद, ज्वारी, तूर, इलेक्ट्रिक मोटार जळून खाक झाली असून, गुरांसाठीचा चारा, कुडाचे राहते घर, टीव्ही, शेतीसाठीचे पाइप संच तसेच शेतीपयोगी व घरातील सर्व वस्तू संपूर्णत: जळून खाक झाले असून, दोन लाख रुपये नुकसान झाले. आगीचा पंचनामा करतेवेळी उपसरपंच गजानन लक्ष्मण पाटील, लक्ष्मण पाटील, श्रीकृष्ण बढे, मधुकर पाटील, रमेश तायडे, भिका हिवाळे हे उपस्थित होते. सदर आगीत मधुकर पाटील यांचा मुलगा अमोल यांच्या हात भाजला आहे.