घराला आग, एक लाखाचे साहित्य खाक; शेजाऱ्याच्या घरालाही पोहोचली झळ
By अनिल गवई | Published: April 20, 2024 09:00 PM2024-04-20T21:00:56+5:302024-04-20T21:01:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: खामगाव पिंपळगाव राजा रोडवरील घाटपुरी गावालगत असलेल्या एका वस्तीतील मजूर महिलेच्या घराला शनिवारी दुपारी आग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगाव पिंपळगाव राजा रोडवरील घाटपुरी गावालगत असलेल्या एका वस्तीतील मजूर महिलेच्या घराला शनिवारी दुपारी आग लागली. या आगीत महिलेचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
प्राप्त माहितीनुसार, घाटपुरी येथील पिंपळगाव राजा रोडवरील एका वस्तीत राहणाऱ्या कामिनाबाई सदाशिव ठाकरे या सकाळी स्वयंपाक करून शेतात कामाला गेल्या. दरम्यान, काही वेळाने त्यांच्या घराला आग लागली. त्यांच्या घराने पेट घेतल्यानंतर शेजाऱ्यांनी घरातील गॅस सिलिंडर आणि काही साहित्य बाहेर काढले. उन्हामुळे आगीची झळ त्यांचे शेजारी जगन्नाथ प्रकाश सोळंके यांच्या घरालाही बसली. या घटनेची माहिती मिळताच खामगाव नगर पालिकेचे अग्निशमन पथक घटक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्वरित आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत महिलेच्या घरातील कूलरसह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. तर सोळंके यांच्या घराच्या काही भागाने पेट घेतला आहे.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पीएसआय अनिल भगत, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र मोरे, रफिक शेख, चालक भगवान सोसे यांनी घटनास्थळ पंचनामा केला.
.......