धक्कादायक! घराच्या वाटणीचा वाद विकोपास; आईला मुलासह सुनेची मारहाण
By अनिल गवई | Updated: May 9, 2024 16:45 IST2024-05-09T16:44:17+5:302024-05-09T16:45:48+5:30
याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला.

धक्कादायक! घराच्या वाटणीचा वाद विकोपास; आईला मुलासह सुनेची मारहाण
अनिल गवई, खामगाव: घराच्या हिस्सेवाटीचा वाद विकोपाला गेल्याने मुलासह सुनेने एका ५५ वर्षीय वृध्देला जबर मारहाण केल्याची घटना बाळापूर फैलात बुधवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, मंदाबाई दादाराव सोनोने या रात्री घरी असताना आरोपी कपिल हा दारासमोर आला. शिविगाळ करीत केस ओढले. खाली पाडून लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी तक्रारदार महिलेचा पती आणि मुलगी आवरण्यास गेली असता, त्यांनाही मारहाण केली. घराच्या हिस्सेवाटणीवरून मुलगा आणि सुनेकडून सतत त्रास देत, शिविगाळ व जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या प्रकरणी पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून शहर पोलीसांनी पती पत्नी विरोधात शहर पोलीसांनी भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोहेकॉ रामेश्वर फासे करीत आहेत.