शौचालय बांधकामासाठी घरोघरी संपर्क अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 06:57 PM2017-09-24T18:57:20+5:302017-09-24T18:57:53+5:30
पिंपळगांव सैलानी (बुलडाणा): येथून जवळच असलेल्या पळसखेड भट गावाची हागणदारी मुक्तीकडे वाटचाल सुरु असून अनेकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले असून गाव लवकरच हागणदारी मुक्त होत आहे. यासाठी पंचायत समितीअंतर्गंत घरोघरी संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

यासाठी पंचायत समिती स्तरावरुन गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ आणि तहसिलदार सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समुह समन्वयक जया गवई, सरपंच भाग्यश्री गायकवाड व ग्रामपंचायतचे पदाधिकारी ग्रामसेवक प्रमोद मापारी, ग्रामपंचायत एकनाथ काने, कोतवाल विठ्ठल चिंचोले हे प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहे. शौचालय बांधकामासाठी शासनाकडून मिळणारे १२ हजार रूपये अनुदान कमी पडत असल्याने ‘स्वच्छ भारत अभियान’ हे प्रभावीपणे राबविण्यासाठी वाढती महागाई लक्षात घेऊन शासनाने अनुदानात वाढ करण्याची अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते भगवान गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. भेटीप्रसंगी समुह समन्वयक जया गवई यांनी कुटूंबाकडे शौचालय नसलेल्या कुटूंबांना विविध प्रकारचे रोग जडत असल्याचे सांगितले. तसेच ज्यांच्याकडे शौचालय नाही. अशांना शासनाच्या कोणत्याही योजनाचा लाभ यापुढे मिळणार नसल्याचे तसेच प्रत्येक कुटूंबात शौचालय नसल्यामुळे संपूर्ण गावात घाणीचे साम्राज्य पसरत असल्याने अनेकांना दवाखान्याचा मार्ग धरावा लागत असल्याचे सांगितले.