लसीकरणासाठी नोंदणी सुरू होताच पाच मिनिटांत हाऊसफुल्ल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:36 AM2021-05-12T04:36:00+5:302021-05-12T04:36:00+5:30
दुपारी १२ वाजता रहा तयार कोरोनावर लस हाच प्रभावी उपाय असल्याचे समोर आल्याने लसीसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ नागरिकांवर आली ...
दुपारी १२ वाजता रहा तयार
कोरोनावर लस हाच प्रभावी उपाय असल्याचे समोर आल्याने लसीसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक असून, दुपारी १२ वाजता नोंदणी सुरू होते. अवघ्या काही मिनिटाच्या कालावधीत नोंदणी हाऊसफुल्ल होते. जिल्ह्यातील सर्वच केंद्रात हीच परिस्थिती असल्याचे दिसून येते.
एक आठवड्यापासून प्रयत्न करतोय
कोरोनावर लसीकरण हा प्रभावी उपाय असल्याचे सांगण्यात येत असल्याने लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी व्हावी, म्हणून मागील एक आठवड्यापासून प्रयत्न करीत आहे. परंतु, अजून नोंदणी झालेली नाही.
- विशाल इंगळे.
१ मेपासून लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर मागील पाच दिवसापासून नोंदणीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु, काही वेळेतच संकेतस्थळ बंद होत असल्याने नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. पुरेशा प्रमाणात लसीचा साठा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
- ज्ञानेश्वर पवार.
लसीकरणासाठी नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत असतानाही अजून नोंदणी झालेली नाही. नोंदणी केव्हा होईल, याबाबत काही निश्चितता नसल्याने लस केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
-गजानन चव्हाण.
१८ ते ४४ वयोगटातील किती जणांचे झाले लसीकरण?
८०४५