खाद्यतेलाचे भाव वाढल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:35 AM2021-03-27T04:35:56+5:302021-03-27T04:35:56+5:30

मागील आठवडाभरापासून तेलाच्या किमती वाढत आहेत. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. तर अनेकांचा व्यवसाय डबघाईस आल्याने ओढाताण करून जीवन ...

The housewife's budget collapsed due to rising edible oil prices | खाद्यतेलाचे भाव वाढल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले

खाद्यतेलाचे भाव वाढल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले

Next

मागील आठवडाभरापासून तेलाच्या किमती वाढत आहेत. कोरोनामुळे अनेकांची नोकरी गेली. तर अनेकांचा व्यवसाय डबघाईस आल्याने ओढाताण करून जीवन जगत आहेत. त्यातच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने महिलांना स्वयंपाकाची घडी बसविण्यासाठी मोठी अडचण जात आहे. आठवडाभरापूर्वी सोयाबीन तेल किरकोळ बाजारपेठेत १२० रुपये किलो होते. मात्र, आता त्यामध्ये १५ रुपयांची वाढ झाल्याने १३५ रुपयांवर पोहोचले आहे. पामतेल १२५ रुपये प्रतिलिटर, आरबी १२५ रुपये, फल्ली तेल १६०, सूर्यफूल १६५ रुपये प्रतिकिलोने विक्री केले जात आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

साखर स्थिर तर डाळीमध्ये चार ते पाच रुपयांची वाढ

मागील महिनाभरापासून साखरेचे दर ३६ रुपये किलो स्थिर आहेत. तर डाळीच्या दरामध्ये चार ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत तूरडाळ शंभर ते ११० रुपये किलो, चणाडाळ ७० ते ८० रुपये, मसूर ७० ते ८०, मूगमोगर १०० ते ११०, मूगडाळ १०० ते ११० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. त्यामुळे दररोजच्या जेवणातील वरण बनविणे कठीण झाले आहे.

Web Title: The housewife's budget collapsed due to rising edible oil prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.