त्या रेशनकार्डांचा हिशेब लागणार कसा?
By admin | Published: April 20, 2015 10:39 PM2015-04-20T22:39:58+5:302015-04-20T22:39:58+5:30
खामगावातील सर्वच कार्डांंची तपासणी करण्याची मागणी.
खामगाव : खामगाव शहरात बोगस शिधापत्रिकांचा घोळ आमदार भाऊसाहेब फुंडकर यांनी उघड केल्यानंतर या प्रकरणातील अनेक तथ्य समोर येऊ लागले आहेत. बुलडाणा जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून खामगावला २0 हजार शिधा पत्रिका दिल्या होत्या. त्यापैकी १३ हजार ५00 शिधापत्रिकांचा हिशेब जुळला आहे. उर्वरित ६ हजार ५00 शिधापत्रिकांचा हिशेब लागत नसल्याने खामगाव शहरातील सर्वच शिधापत्रिकांची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोगस शिधापत्रिकांचा गोंधळ हा केवळ ह्यव्हीआयपीह्णच्या नावाने तयार केलेल्या शिधापत्रिकांपुरताच र्मयादित नाही तर अनेक शिघापत्रिकांची शासन दरबारी कुठलीही नोंद नसताना झालेले वितरण चौकशीच्या फेर्यात येणे गरजेचे आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून खामगाव पुरवठा विभागाला प्राप्त झालेले रेशनकार्ड शहरातील स्वस्त धान्य दुकानदारांना वाटले. या दुकानदारांनी नवीन रेशनकार्डासाठी भरावे लागणारे चलानही भरले आहे; मात्र चलानची रक्कम व वाटलेले रेशनकार्ड हा आकडा केवळ १३ हजार ५00 च्या घरात असून, उरलेल्या ६ हजार ५00 रेशनकार्डांंचा हिशेब लागत नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करतानाच खामगाव शहरातील सर्वच शिधापत्रिकांबाबत संशय आहे. ज्या रेशनकार्डधारकांनी एखाद्या व्यक्तीच्या नावाने चलान भरले असेल ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्नही अनुत्तरीतच आहे.