पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:34 AM2021-05-13T04:34:53+5:302021-05-13T04:34:53+5:30
बुलडाणा : गत काही दिवसांपासून काेराेना संक्रमण माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने आराेग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढत आहे़ तसेच संचारबंदी ...
बुलडाणा : गत काही दिवसांपासून काेराेना संक्रमण माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने आराेग्य कर्मचाऱ्यांवरील ताण वाढत आहे़ तसेच संचारबंदी व लाॅकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करताना पाेलिसांवरही कामाचा ताण माेठ्या प्रमाणात वाढला आहे़ वाढत्या ताणामुळे पाेलीस आणि आराेग्य कर्मचारी मानसिकरीत्या थकल्याचे चित्र आहे़ त्यांचा थकवा दूर करण्यासाठी याेगाची शिबिरे, मेडिटेशन व इतर उपाययाेजना करण्यात येत आहेत़
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस व आरोग्य प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. रात्रंदिवस काम करावे लागत असल्याने पोलीस व आरोग्याधिकारी, कर्मचाऱ्यांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. एरवी योग शिबिरे, मेडिटेशन शिबिरे घेतली जात असली तरी कोरोनाकाळात मात्र त्यांना खो बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कसा घालविणार, हा प्रश्न निर्माण होत आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वच विभागांचे कर्मचारी, अधिकारी पुढाकार घेत असले तरी यात आरोग्य व पोलीस प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. दररोज कोरोना रुग्ण आढळत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसह डॉक्टरांचे काम वाढले आहे. जिल्हा प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत निर्बंध घातल्याने या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ‘पोलीस प्रशासनावर आली आहे. यातून ताणतणाव वाढत असून, मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. दोन्ही विभागांच्या वतीने योग शिबिरे, ध्यानधारणा शिबिरे घेण्यात येतात़ त्यातून या कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येताे़
काेराेना संक्रमण वाढल्यापासून आराेग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे़ कर्मचाऱ्यांचे मानसिक आराेग्य चांगले रहावे, यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात येते़ तसेच कामाचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात़
डाॅ़ बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आराेग्य अधिकारी, बुलडाणा
काेरोना काळातही पाेलिसांचे काम सुरूच आहे़ सध्या संचारबंदीसह इतर कामांमुळे पाेलीस कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे़ पाेलिसांचा मानसिक थकवा कमी करण्यासाठी नुकतेच याेग शिबिर आयाेजित करण्यात आले हाेते़ तसेच इतरही उपक्रम राबवण्यात येतात़
अरविंद चावरिया, पाेलीस अधीक्षक, बुलडाणा
काेराेनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच असून, मृत्यूही वाढले आहेत़ डाेळ्यांसमाेर हाेत असलेले मृत्यू पाहून आराेग्य कर्मचाऱ्यांच्या मनावर परिणाम हाेत आहेत. मानसिक आराेग्य चांगले ठेवण्यासाठी आराेग्य कर्मचाऱ्यांनी व्यक्त झाले पाहिजे़ नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार ठेवून काम करावे़ रुग्णांचे नातेवाईक आणि राजकारणी लाेकांनीही आराेग्य कर्मचाऱ्यांच्या भावना समजून त्यांना आधार दिला पाहिजे़ महामारीच्या काळात सेवा देणाऱ्या आराेग्य कर्मचाऱ्यांना आधार दिल्यास त्यांना आणखी बळ मिळेल़
डाॅ़ विश्वास खर्चे, मानसाेपचार तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा
काेट
पाेलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच याेग शिबिर घेण्यात आले आहे़ मात्र, पोलीस ठाणे स्तरावर ही शिबिरे झाल्यास जास्त फायदा होईल. सध्या कोरोनामुळे काम वाढले असून, कुटुंबीयांना वेळही देता येत नाही, त्यामुळे मानसिक थकवा जाणवत असल्याचे पोलीस कर्मचाऱ्याने सांगितले.
काेट
कोरोनामुळे कामाचा व्याप वाढला आहे, यामुळे कुटुंबीयांना वेळ देता येत नाही, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दरबार भरविला जातो. तसेच योग शिबिरे, ध्यान शिबिरेही घेतली जातात. रस्त्यावर ड्युटी करावी लागत असल्याने कुटुंबात जाताना भीती वाटते, असे एका पाेलीस कर्मचाऱ्याने सांगितले़
काेट
काेराेना रुग्णांची संख्या वाढतच असल्याने आराेग्य कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे़ पाॅझिटिव्ह रुग्णांमध्ये काम करीत असल्याने कुटुंबीयांमध्ये जाताना भीती वाटते़ मानसिक ताण कमी करण्यासाठी उपाययाेजना करण्याची गरज आहे, असे मत एका परिचारिकेने व्यक्त केले.
सध्या आराेग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा माेठा ताण वाढला आहे़ डाेळ्यांसमाेर रुग्णांचा मृत्यू पाहणे कठीण आहे़ त्यामुळे मानसिक थकवा आला आहे़ हा थकवा दूर करण्यासाठी समुपदेशन व इतर उपक्रम राबविण्याची गरज आहे, असे मत एका डाॅक्टरांनी व्यक्त केले.