‘डेल्टा प्लस’ला कसे रोखणार, दोन्ही डोस घेणारे केवळ ५.५० टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:23 AM2021-07-08T04:23:33+5:302021-07-08T04:23:33+5:30
-- १८ ते ४४ वयोगटात ०.२२ टक्केच लसीकरण-- जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील जवळपास १२ लाखांच्या आसपास नागरिक आहेत. ...
-- १८ ते ४४ वयोगटात ०.२२ टक्केच लसीकरण--
जिल्ह्यात १८ ते ४४ वयोगटातील जवळपास १२ लाखांच्या आसपास नागरिक आहेत. त्यापैकी २ हजार ७२५ जणांनीच दोन्ही डोस घेतलेले आहेत. या वयोगटात आतापर्यंत नोंदणी केलेल्या १ लाख १ हजार २०४ जणांनी पहिला डोस घेतलेला आहे.
--४५ वर्षांवरील व्यक्तींचे ११ टक्के--
जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील व्यक्तींचे ११.७७ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. अर्थात १ लाख ४ हजार ६६५ व्यक्तींनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहे. पहिला डोस ३ लाख ४ हजार ७५३ (३४ टक्के) जणांनी घेतलेला आहे. ४५ वर्षांवरील ९ लाख ८९ हजार २६६ जणांचे लसीकरण करण्याचे आरोग्य विभागाचे उदिष्ट आहे.
--------
जिल्ह्यातील एकूण लसीकरण:- ६,२९,०९२
पहिला डोस:- ४,८८,२१५
दुसरा डोस:- १,४०,८७७
--ग्रामीण भागात अद्यापही कोरानाचे रुग्ण--
जिल्ह्यात अद्यापही कोरोना संदर्भाने ८५ प्रतिबंधित क्षेत्रे असून यातील ३३ क्षेत्रे ही ग्रामीण भागात आहे. यामध्ये जवळपास ५०० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागात ज्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या भागावर लक्ष ठेवून आहे. अशा भागातील लसीकरण जवळपास ३ टक्के झालेले आहे.