मलकापूरात जोडे-चपलांच्या गोदामाला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:24 AM2020-04-29T10:24:49+5:302020-04-29T10:25:26+5:30
जेठवा शू पॅलेसचा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.
मलकापूरः येथील स्टेशन रस्त्यावर जोडे-चपलांच्या गोदामाला भिषण आग लागल्याची घटना आज बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. त्यात जेठवा शू पॅलेसचा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की,जुगराज जेठमल भंसाली कापड विक्रेते यांचे दुकान दुसऱ्या जागेत शिफ्ट झाले आहे. मात्र त्यांच्मा कुटुंबाचे वास्तव्य वरच्या मजल्यावर आहे.
मागिल काही महिन्यापासून त्यांच्या गोडाऊन मध्ये समोरच असलेल्या जेठवा शू पॅलेसचा भाडेतत्वावर जागा घेऊन लाखो.रुपयांचा माल ठेवण्यात आला होता.वरच्या मजल्यावर भंसाली कुटुंबाचे वास्तव्य आहे.
आज बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास भंसाली परिवारातील सदस्य व शेजारच्या दुकानदार व वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना धुरळा निदर्शनास आला. बघता बघता आगेचे डोंब उठल्यावर त्यांनी तात्काळ नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ यांना माहीती दिल्याने काही मिनिटात पालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. व दलाच्या कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने आग विझवण्यात यश आले.
मात्र तोवर भंसाली यांच्या गोडाऊन मधे असलेल्या तीन मोटारसायकल व जेठवा शू पँलेसच्या विविध प्रकारच्या चपला, विविध प्रकारचे बुट असा लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. शेजारीच अनेक दुकाने व वरच्या मजल्यावर नागरिकांचे वास्तव्य आहे.पण सुदैवाने कुठल्याही प्रकारची जिवीत हाणी झाली नाही.
या घटनेची वार्ता कळताच विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना.चैनसुख संचेती यांनी घटनास्थळी भेट दिली. पाहणी करून योग्य ती मदत नुकसानग्रस्तास शासनाकडून मिळवून देण्यासाठी त्यांनी आश्चस्त केले. आगीच्या घटनेमुळे नागरिकांना एकच गर्दी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. शार्टसर्किट मुळे आग लागली असावी असा अंदाज आहे.
(तालुका प्रतिनीधी)