‘बेटी बचाओ’साठी मानवी श्रृंखला
By admin | Published: March 9, 2017 01:44 AM2017-03-09T01:44:23+5:302017-03-09T01:44:23+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन; जि.प.सीईओ मुधोळ यांचा पुढाकार.
बुलडाणा, दि. ८- समाजामध्ये मुलींचा घटता जन्मदर बघता याबाबत जाणीव-जागृती होणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने त्यासाठी ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्ण अभियान सुरू केले. या अभियानात बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरात जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने मानवी श्रृंखलेचे आयोजन करून ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्णचा हुंकार जागतिक महिलादिनी ८ मार्च रोजी देण्यात आला. ही मानवी श्रृंखला सुमारे ८ किलोमीटर लांबीची होती. या श्रृंखलेत तब्बल नऊ हजार शालेय विद्यार्थी, शिक्षक, नागरिक सहभागी झाले होते .
ह्यबेटी बचाओ-बेटी पढाओह्णची व्यापक जाणीव जागृती मोहीम जिल्ह्यात सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा या मोहिमेत सक्रिय सहभाग असावा, हा संकल्प चिरस्थायी असणे अपरिहार्य आहे. त्यासाठी या मानवी श्रृंखलेचे आयोजन करण्यात आले. मानवी श्रृंखलेचा मुख्य कार्यक्रम गांधी भवन, जयस्तंभ चौक येथे आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अलका खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ, जयश्री शेळके आदी उपस् िथत होते.
मानवी श्रृंखलेची सुरूवात सहकार विद्या मंदिर विद्यालयापासून करण्यात आली. येथे सिंदखेडराजा येथून आलेल्या जिजाऊ ज्योत यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी बुलडाणा अर्बनच्या कोमल झंवर व मान्यवरांनी ज्योतीचे स्वागत केले. जि.प उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, सिंदखेड राजा गटशिक्षणाधिकारी दीपक सवडतकर यांनी ही ज्योत सीईओ दीपा मुधोळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. त्यानंतर ही ज्योत आद्यलेखिका श्रीमती ताराबाई शिंदे यांच्या वाड्यात नेण्यात आली. या ठिकाणी ताराबाई शिंदे यांना अभिवादन करण्यात आले. मानवी श्रृंखलेचा शेवट डॉल्फीन जलतरण तलावाजवळ करण्यात आला. त्याचप्रमाणे या मानवी श्रृंखलेने जयस्तंभ चौकाला चार वेढे दिले होते. अशाप्रकारे संपूर्ण ८ किलोमीटर लांब ही श्रृंखला होती.
मानवी श्रृंखलेत जिल्हा पत्रकार संघाच्या लेक वाचवा अभियानाचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पत्रकार, वकील, विद्यार्थी, समाजाच्या विविध घटकांमधील मान्यवर, नागरिक यांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.