मानवाच्या उपभोगाच्या वर्तनात सुधारणा आवश्यक : माहोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:39 AM2021-07-14T04:39:50+5:302021-07-14T04:39:50+5:30
चिखली : पृथ्वीतलावरील मानवाच्या उपभोगाच्या वर्तनात सुधारणा झाली तरच पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन जगाचा शाश्वत विकास होईल आणि येणाऱ्या ...
चिखली : पृथ्वीतलावरील मानवाच्या उपभोगाच्या वर्तनात सुधारणा झाली तरच पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊन जगाचा शाश्वत विकास होईल आणि येणाऱ्या पिढ्यांना पाणी, गॅस, तेल इत्यादी नैसर्गिक संसाधनाचा उपयोग घेता येईल, असे मत डॉ. आर. वाय. माहोरे यांनी व्यक्त केले.
स्थानिक श्रीशिवाजी विज्ञान व कला महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त महाराष्ट्रातील ख्यातनाम अर्थतज्ज्ञ तथा नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. आर. वाय. माहोरे हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. ओमराज एस. देशमुख होते. डॉ. देशमुख यांनी भारतातील वाढती लोकसंख्या आणि दारिद्र्य, गरिबी, बेकारी या प्रश्नाकडे लक्ष वेधून आर्थिक विकास आणि शिक्षणाच्या दर्जात वाढ होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व विषद केले. प्रास्ताविक डॉ. वनिता पोच्छी, तर परिचय, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनीता कलाखे दिला. डॉ. माहोरे यांचे ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या या व्याख्यानाला प्रा. रामदास भांडवलकर, यवतमाळ, डॉ. संजय महाजन, नागपूर, डॉ. दिलीप महाजन, डॉ. प्रदीप बारड, प्रा. विजय वाकोडे, चिखली, डॉ. आरती खडतकर, डॉ. महेश रिठे, बुलडाणा यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी संख्येने सहभाग नोंदविला. संचालन प्रा. डॉ. अनुराधा मुळे यांनी, तर आभार प्रा. धनंजय भोयर यांनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ. अनिल गारोडे, डॉ. सोनाली गायकवाड, प्रा. दिलीप गावंडे, प्रा. मुकुंद कोलते, डॉ. अंकित काळे यांनी परिश्रम घेतले.