Buldhana: बुलढाण्यात शेकडो वराहांचा अज्ञात रोगाने मृत्यू, नमुने तपासणीसाठी पाठविले

By निलेश जोशी | Published: August 26, 2023 07:11 PM2023-08-26T19:11:57+5:302023-08-26T19:13:37+5:30

Buldhana: शहर परिसरासह लगतच्या ग्रामीण भागात वराहांचा अज्ञात आजाराने मृत्यू होत असून जवळपास दोन महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. गेल्या आठ दिवसापासून त्याचे प्रमाण वाढले आहे.

Hundreds of boars died of unknown disease in Buldhana, samples sent for examination | Buldhana: बुलढाण्यात शेकडो वराहांचा अज्ञात रोगाने मृत्यू, नमुने तपासणीसाठी पाठविले

Buldhana: बुलढाण्यात शेकडो वराहांचा अज्ञात रोगाने मृत्यू, नमुने तपासणीसाठी पाठविले

googlenewsNext

- नीलेश जोशी 
बुलढाणा - शहर परिसरासह लगतच्या ग्रामीण भागात वराहांचा अज्ञात आजाराने मृत्यू होत असून जवळपास दोन महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. गेल्या आठ दिवसापासून त्याचे प्रमाण वाढले आहे. २६ ऑगस्ट रोजी एका मृत वराहाचे शवविच्छेदन करून त्याचे नमुने अैांध (पुणे) येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठविले आहे. परंतू वराहांच्या मृत्यूमुळे मात्र जनमानसात घबराट आहे.

वराहांच्या मृत्यूचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. त्यातच वेळेत मृत वराह उचलण्यात येत नसल्याने त्याच्या दुर्गंधीचीही समस्या नागरिकांना जाणवत आहे. बुलढाणा शहर परिसरासह, सागवन, सुंदरखेड सह लगतच्या ग्रामीण भागात वराहांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचाही फोन रोज खणखणत असून पालिका कर्मचारीही या वराहांची विल्हेवाट लावण्यात व्यस्त झाले आहे. दरम्यान नेमक्या कोणत्या आजारामुळे या वराहांचा मृत्यू होतोय ही बाब अद्यापही स्पष्ट झालेली नाही. वर्तमान स्थितीत दररोज १५ ते २० वराहांचा मृत्यू होत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी सुनील बेंडवाल यांनी सांगितले.

दोन महिन्यापासून सुरू असलेला हा प्रकार गेल्या आठ दिवसात वराहांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने समोर आला. विशेष म्हणजे वराहांची शिकार करण्यात एक्सपर्ट झालेले बुलढाण्यातील मोकाट कुत्रेही वराहाच्या मृत्यूनंतर त्याला तोंड लावत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेमका आजार काय? याचेही निदान होण्याची गरज आहे.

पशुसंवर्धन विभागाने घेतले नमुने
यासंदर्भात पालिकेकडे नागरिकांनी विचारणा केल्यानंतर पालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने २६ ऑगस्ट रोजी एका मृत वराहाचे शवविच्छेदन करून नमुने घेतले आहेत. आता हे नमुने अैांध येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यासोबतच अकोला येथील प्रादेशिक रोग अन्वेषण विभागालाही यासंदर्भात माहिती देण्यात आली असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

८ ते १५ दिवसाय येईल अहवाल
वहारांच्या मृत्य संदर्भाने एका वराहाचे शवविच्छेदन करून त्याचे नमुने अैांध येथील रोग अन्वेषण विभागाकडे पाठविण्यात आले असून आगामी आठ ते दहा दिवसात त्याचा अहवाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. एकाद्या संसर्गजन्य रोगामुळे या वरहांचा मृत्यू होत असावा अशी शक्यता पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. पाचरणे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना स्पष्ट केले.

Web Title: Hundreds of boars died of unknown disease in Buldhana, samples sent for examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.