शेकडो महिलांचा पाण्यासाठी आक्रोश; सुबोध सावजींच्या उपोषण मंडपाला भेट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:57 AM2018-04-18T00:57:58+5:302018-04-18T00:57:58+5:30
बुलडाणा : मेहकर तालुक्यातील द्रुगबोरी या आदिवासी गावातील तसेच शेगाव संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वाण, टुनकी, सोनाळा, वरखेड येथील शेकडो महिलांनी १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या सुबोध सावजी यांच्या उपोषणाला भेट देऊन ‘पाणी द्या हो’ चा टाहो फोडत प्रशासनाप्रती आपला तीव्र संताप व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : मेहकर तालुक्यातील द्रुगबोरी या आदिवासी गावातील तसेच शेगाव संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वाण, टुनकी, सोनाळा, वरखेड येथील शेकडो महिलांनी १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या सुबोध सावजी यांच्या उपोषणाला भेट देऊन ‘पाणी द्या हो’ चा टाहो फोडत प्रशासनाप्रती आपला तीव्र संताप व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या बुलडाणा जिल्हा शासकीय नळ योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या उपोषण मंडपात दाखल झालेल्या शेकडो महिलांनी प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त केला.
या उपोषणाचा आज सातवा दिवस होता. मंगळवारी सकाळी दहा वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. मारोडकर चमूसह उपोषण मंडपात दाखल झाले. उपोषणकर्ते सुबोध सावजी यांचे वजन करण्यासाठी आलेली वजन मोजण्याची ताण काट्याची जुनी मशीनवर त्यांचे वजन केले असता वजन चुकीचे दर्शवित असल्याचे लक्षात आले. तेव्हा नवीन अँटोमॅटिक सेलवर चालणारी मशीन स्वत: मंडपात ठेवून वजन करण्यात आले, तर सुबोध सावजी यांचे वजन ९७ किलो ३00 ग्रॅम भरले. सुरुवातीला सरकारी मशीनवर वजन केले असता, त्यांचे वजन १४ किलो जास्त भरले. ही मशीन वजन मोजणारी की वजन वाढविणारी, असा प्रश्न उपस्थिताना पडला.
दुसर्या फेरीत आरोग्य तपासणीसाठी दुपारी साडे अकरा वाजता आलेल्या प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मकानदार, निवासी आरोग्य अधिकारी डॉ. राठोड चमूने भेट दिली असता, माणसाचे वजन मोजणारी मशीन सरकारी यंत्रणेप्रमाणे बोगस असल्याचे सुबोध सावजी यांनी लक्षात आणून दिले, तरीसुद्धा अधिकार्यांनी नवीन मशीन उपलब्ध करून दिली नाही, त्यामुळे उपोषणकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून अधिकार्यांचा निषेध केला.
दुपारी शेकडो महिला उपोषण मंडपात दाखल झाल्या. महिलांनी हातात माईक घेऊन ‘पाणी द्या हो.’ चा टाहो फोडला. द्रृगबोरीच्या नर्मदाबाई वायसे, रूखमाबाई गायकवाड, ताराबाई शिंदे, सुशिलबाई इंगळे यांनी दररोज एक टँकर गावात येते असे सांगितले. परंतू अध्र्या गावाला पाणीच मिळत नाही. नळ योजना कागदोपत्रीच मंजूर झाली. दहा कि. मी. वरून रात्रभर पाणी भरावे लागते अशा प्रशासकीय अधिकार्यांच्या विरोधात भावना व्यक्त केल्या.
उपोषण मंडपाला आमदार राहुल बोंद्रे, गंगाधर जाधव, सायली सावजी, जयश्री शेळके, नंदा पाऊलझगडे, दीपक देशमाने, समाधान सुपेकर, डॉ. झाडोकार, विनोद देशमुख, मधुकर गवई, मोहन जाधव, अँड. राजेश गवळी, प्रभाकर पवार, मनोहर बोराखडे, गोपाल वानेरे, वामनराव देशमुख, मुन्ना ठेकेदार, आशिष जाधव, ताराबाई शिंदे, सुशिला इंगळे, मंगला वानेरे, बशीरबाई शे. करीम, नंदाबाई गिर्हे, सुधाकर ढोणे, नर्मदा वायसे यांनी भेटी दिल्या.