काळविटाची शिकार करुन खुलेआम मांसविक्री; बुलडाणा जिल्ह्यातील किन्होळा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 04:39 PM2018-07-22T16:39:47+5:302018-07-22T16:42:50+5:30
बुलडाणा : हरिणाची शिकार करुन मांसविक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिखली तालुक्यातील किन्होळा येथे २२ जुलै रोजी सकाळी छापा मारला.
बुलडाणा : हरिणाची शिकार करुन मांसविक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिखली तालुक्यातील किन्होळा येथे २२ जुलै रोजी सकाळी छापा मारला. मात्र कर्मचाऱ्यांना पाहून मांस विकणारे फरार झाले. वनविभागाने घटनास्थळावरुन मृत हरिण, काळविटाचे कातडे, चार पाय, डोके जप्त केले. चिखली तालुक्यातील किन्होळा येथे हरिणाची मास विक्री सुरु असल्याची गुप्त माहिती बुलडाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश टेकाळे यांना २२ जुलै रोजी सकाळी मिळाली. माहितीवरुन वनपाल भोसले, वनरक्षक समाधान मांटे, वनमजूर वसंता सावळे, परमेश्वर सावळे सरकारी वाहनाने सकाळी आठ वाजता घटनास्थळी पोहोचले. किन्होळापासून एक किलोमिटर अंतरावर धोडप मार्गावरील विकास बाहेकर यांच्या शेतातील विहिरीजवळ काही लोक बसलेले दिसले. वनविभागाच्या पथकाला बघितल्यानंतर त्यांनी धूम ठोकली. कर्मचाºयांनी घटनास्थळावरुन एक मृत हरिण, मास विकलेल्या काळविटाची कातडी, चार पाय, शिंग व तराजू जप्त केले. पंचनामा केल्यानंतर मृत हरिणाला बुलडाणा येथे आणले. पशुधन विकास अधिकारी डॉ. मोरे यांनी हरिणाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर हरिणाचा दफनविधी करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन अधिकारी रजेवर
सध्या वनविभागाचा कारभार रामभरोसे सुरु आहे. उपवनसंरक्षक वाढई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तब्येत बिघडल्याने ते एक महिन्याचे सुटीवर आहेत. तर एसीएफ गिरी यांच्या हाताची शस्त्रक्रिया झाल्याने ते सुटीवर आहेत. महत्वाचे दोन अधिकारी सुटीवर असल्याने कामकाजावर परिणाम झाला आहे. सध्या सामाजिक वनीकरणचे उपसंचालक पार्डीकर यांच्याकडे उपवनसंरक्षकांचा पदभार आहे.
शिकारीकडे वनविभागाने द्यावे लक्ष!
वनविभागाच्या नजरा चुकवून जिल्'ातील अनेक ठिकाणी हरिण, नीलगाय, रानडुक्कर, ससा आदी वन्यजिवांची शिकार करुन मासविक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. काही लोकांनी शिकार हेच उदरनिवार्हाचे साधन बनविले आहे. शेतात, जंगलात जाळे लावून वन्यजिवांची शिकार केली जाते. त्यानंतर जास्त किंमतीत लोकांना मासविक्री करण्यात येते. याकडे वनविभगाने लक्ष देण्याची गरज आहे.