गोहोगाव येथे चक्रीवादळामुळे घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:35 AM2021-05-12T04:35:20+5:302021-05-12T04:35:20+5:30
गाेहाेगाव दांदडे येथे रविवारी दुपारी वादळासह पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. काही ...
गाेहाेगाव दांदडे येथे रविवारी दुपारी वादळासह पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. काही घरांवरील टिनपत्रे उडाली होती, तसेच परिरसरातील मोठी झाडे पडली. वादळामुळे गजानन दांदडे, नामदेव दांदडे, विनायक दांदडे, गजानन बघे, प्रमोद बनसोडे, रामेश्वर दांदडे, शे. सरदार यांच्यासह आणखी इतर नागरिकांचे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. काही घरांवरील उडालेले टिनपत्रे, टिनशेड हे जवळपास ५०० फुटांपेक्षाही जास्त दूर उडाले. तसेच ५० वर्षे जुन्या असलेल्या काही माड्यांवरील पत्रेसुद्धा उडाली हाेती. तलाठी गणेश उंबरकर यांनी नुकसानाची पाहणी केली. वादळामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.