पती पतीच्या भांडणात मध्यस्थी आली पोलिसाच्या अंगलट; पतीनं काढला राग

By अनिल गवई | Published: October 17, 2023 10:58 AM2023-10-17T10:58:43+5:302023-10-17T10:58:47+5:30

पत्नी तक्रार देण्यासाठी आल्याने पतीराजाचा पोलीस स्टेशनात राडा

Husband and wife fight in Buldhana, husband angered the police | पती पतीच्या भांडणात मध्यस्थी आली पोलिसाच्या अंगलट; पतीनं काढला राग

पती पतीच्या भांडणात मध्यस्थी आली पोलिसाच्या अंगलट; पतीनं काढला राग

खामगाव: पोलीस स्टेशनच्या आवारात पती पत्नीमध्ये सुरू असलेले भांडण सोडविणे, त्यांच्यात मध्यस्थी करणे एका पोलीसाच्या चांगलेच अंगलट आले. यावेळी बिथरलेल्या पती चक्क पोलिसावरच ताव काढला. याप्रकरणी शहर पोलीसांनी सोमवारी भांडखोर पती विरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबत पोहेकॉ गजानन पाटील ५५ यांनी शहर पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार सोमवारी ते ड्युटीवर हजर होते. दरम्यान, नंरेंद्र शिवाजी कुंदलवार ४३ याची पत्नी शहर पोलीसांत पती विरोधात तक्रार देण्यासाठी आली. त्यावेळी तिचा नवरा लागलीच तिच्यापाठीमागे धावत आला. पोलीसांत तक्रार देण्यासाठी परावृत्त करण्यासाठी तिला पोलीस स्टेशनमध्येच मारहाण करू लागला. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच एक पोलीस कर्मचारी तेथे समजाविण्यास गेले. त्यावेळी बिथरलेल्या पतीराजाने मागचा पुढचा काहीच विचार न करता, पोलीस कर्मचार्याच्या अंगावर धावून गेला. लोटपाट केली. तोंडावर मुष्ठीप्रहार करून जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून शहर पोलीसांनी भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४ अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पीएसआय लबडे करीत आहेत.
चौकट...

बायकोला सोडले, पोलीसाशी झोंबाझोंबी
नवरा बायकोमध्ये चांगले भांडण झाले. नवर्याच्या त्रासातून सुटका मिळण्यासाठी तिने पोलीसांकडे धाव घेतली. मात्र, तू आमच्या मधात पडू नको म्हणत त्याने बायकोचा राग पोलीसावरच काढला. या प्रकारामुळे सोमवारी शहर पोलीस स्टेशनमध्ये चांगलीच खळबळ उडाली. हा प्रकार वरिष्ठांपर्यंत पोहोचल्यानंतर याप्रकरणी आरोपी पती िवरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. उगीच बोंबाबोंब नको म्हणून सुरूवातीला या प्रकरणावर पडदा टाकण्याचे प्रयत्न झाल्याचीही चर्चा पोलीस वतुर्ळात होत आहे.

Web Title: Husband and wife fight in Buldhana, husband angered the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.