पतीच निघाला पत्नीचा मारेकरी

By admin | Published: May 25, 2015 02:30 AM2015-05-25T02:30:51+5:302015-05-25T02:30:51+5:30

मलकापूर येथील खूनप्रकरण.

Husband left his wife | पतीच निघाला पत्नीचा मारेकरी

पतीच निघाला पत्नीचा मारेकरी

Next

मलकापूर : अज्ञात इसमांनी पत्नीचा खून करुन आपणालाही मारहाण केली असा बनाव करणारा पतीच अखेर पत्नीचा मारेकरी निघाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला २३ मे रोजी दुपारी बहापुरा रेल्वे गेट जवळील मोरी खाली नेत दगडाने ठेचून तिचा निर्घूण खून केल्याचे उघडकीस आले असून यासंदर्भात मृतक विवाहितेच्या भावाने पोलिस स्टेशनला जावयाविरुध्द दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मृतकचा भाऊ गणेश शंकर रोहणकर रा.टुनकी ता.संग्रामपूर याने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, बहीण लक्ष्मीण हिचे सन २00७ मध्ये एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवशी संजय वसंत सपकाळ रा.सावरगाव नेहू ता.नांदुरा यांचे सोबत विवाह झाला. पतीकडे नांदुत असतांना तिला पतीपासून ओम (वय ६) व सोहम (वय ३) अशी २ मुले झालीत. दरम्यान २३ मे रोजी सौ.लक्ष्मीला पती संजय सपकाळ याने दुचाकीवर बसवून गाडी सरळ रस्त्याने न नेता रेल्वे पुलाखाली नेवून लक्ष्मीला दगडाने मारहाण करुन तिचा खून केला व स्वत:च्या डोक्यावर दगड मारुन अज्ञात इसमांनी मारहाण करुन पतीचा खून करुन आपणालाही मारहाण केल्याचा बनाव निर्माण केला. या संशयास्पद घटनेने एकच गुंतागुंत निर्माण केली होती. घटनेची माहिती कळाताच पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतक लक्ष्मीचे प्रेत ताब्यात घेत संजय सपकाळ याला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले होते. दरम्यान पोलिसांनी जखमी संजय सपकाळला घटनेसंदर्भात विचारणा केली असता त्याने शेतीच्या वादावरुन रामकिसन निनाजी कांडेलकर व इतर दोघांनी रेल्वे पुलाजवळ माझी दुचाकी अडवून मला व माझ्या पत्नीला मारहाण केली व यातच पत्नी लक्ष्मी हिचा मृत्यू झाला व मी जखमी झाल्याची बनवाबनवी केली. मात्र पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी केली असता पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मृतक लक्ष्मीचा भाऊ गणेश लोणकर याने रात्री उशिरा दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती संजय सपकाळ विरुध्द कलम ३0२,४९८ अ,भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Husband left his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.