मालेगावात पतीने पत्नीस रॉकेल टाकून पेटविले; पतीविरूद्ध गुन्हा दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:07 IST2017-12-26T22:00:16+5:302017-12-26T22:07:56+5:30
मालेगाव (वाशिम): शहरातील गजानन नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेस तिच्या पतीने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात महिला ८५ टक्के भाजल्या गेली. दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या जबानीवरून आरोपी पतीविरूद्ध २६ डिसेंबर रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

मालेगावात पतीने पत्नीस रॉकेल टाकून पेटविले; पतीविरूद्ध गुन्हा दाखल!
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम): शहरातील गजानन नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेस तिच्या पतीने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. यात महिला ८५ टक्के भाजल्या गेली. दरम्यान, याप्रकरणी संबंधित महिलेने दिलेल्या जबानीवरून आरोपी पतीविरूद्ध २६ डिसेंबर रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार, पुजा आणि मनोज कोकाटे हे दाम्पत्य मालेगाव शहरातील गजानन नगरातील कोगदे यांच्या इमारतीत भाड्याने वास्तव्याला होते. दरम्यान, १७ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घरातून धुर निघत असल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. त्यामुळे कोकाटे यांच्या खोलीकडे धाव घेतली असता पुजा गंभीररित्या भाजल्या गेली होती. तसेच मनोज कोकाटे यांनाही आगीच्या झळा लागल्या होत्या. यावेळी दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुजाची प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले. उपचार सुरू असताना नोंदविण्यात आलेल्या जबानीवरून आपणास पतीनेच पेटवून दिल्याची फिर्याद पुजा कोकाटे हिने दिली. त्यावरून पोलिसांनी मनोज कोकाटे याच्याविरूद्ध भादंविचे कलम ३०७, ४९८ ‘अ’ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक संजय गवली करीत आहेत.