पतीचे विवाहबाह्य संबंध, पत्नीने घेतला गळफास; पतीसह दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल
By संदीप वानखेडे | Updated: June 24, 2024 16:36 IST2024-06-24T16:36:43+5:302024-06-24T16:36:58+5:30
ही घटना उदयनगर येथून जवळच असलेल्या वैरागड येथे २२ जून दुपारी घडली. याप्रकरणी पाेलिसांनी दाेघांविरुद्ध २४ जून राेजी गुन्हा दाखल केला आहे.

पतीचे विवाहबाह्य संबंध, पत्नीने घेतला गळफास; पतीसह दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल
उदयनगर : पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याने हाेत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून २७ वर्षीय विवाहितेने गळफास घेतला. ही घटना उदयनगर येथून जवळच असलेल्या वैरागड येथे २२ जून दुपारी घडली. याप्रकरणी पाेलिसांनी दाेघांविरुद्ध २४ जून राेजी गुन्हा दाखल केला आहे. सुशीला दीपक अंभोरे असे मृतक विवाहितेचे नाव आहे.
वैरागड येथील सुशीला अंभाेरे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी किसन सखाराम सावंग रा. खामगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सुशीला यांच्या पतीचे विवाहबाह्य संबंध हाेते. त्यातून दाेघांमध्ये वाद हाेत हाेता, पती सुशीला यांना शारीरिक व मानसिक त्रास देत हाेता. पती व त्याच्या प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून सुशीला यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून अमडापूर पाेलिसांनी आरोपी दीपक सुरेश अंभोरे रा. वैरागड व आरोपी आरती लाभानी रा. माटरगाव गेरू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ठाणेदार अमडापूर सचिन पाटील हे करीत आहेत.