५0 टक्के निवडणूका असल्यास संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:42 AM2017-09-22T00:42:26+5:302017-09-22T00:42:26+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या २७९ ग्रामपंचायतींमध्ये ७ ऑक्टोबर रोजी मतदान, तर मतमोजणी ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे; तसेच ज्या तालुक्यात ५0 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

नोव्हेंबर ते डिसेंबर २0१७ या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीच्या कामांना सुरुवात झाली आहे; तसेच ज्या तालुक्यात ५0 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत, त्या संपूर्ण तालुक्यात आचारसंहिता लागू राहणार आहे. जिल्ह्यात ५0 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडणूक नसल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू राहणार नाही. निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतींच्या सीमेलगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहील. आदर्श आचारसंहिता जरी संपूर्ण जिल्हा/ तालुका लगतच्या गावांमध्ये लागू असेल, तरी जेथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रामध्ये नसतील त्याठिकाणी विकास कामांवर कसलाही निर्बंध राहणार नाही; मात्र याच क्षेत्रात अशी कोणतीही कृती करता येणार नाही. ज्यामुळे निवडणूका होणार्या ग्रामपंचायतीच्या मतदारांवर विपरित परिणाम पडेल. सदर आचारसंहिता निवडणूक निकाल जाहीर होईपयर्ंत अस्तित्वात राहणार आहे.