वेळपडल्यास शेतकऱ्यांना घरपोच खत, बियाणे - नरेंद्र नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 06:10 PM2020-04-18T18:10:43+5:302020-04-18T18:12:07+5:30

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याशी साधलेला संवाद...

If needed, fertilizers, seeds home delivery to farmers - Narendra Naik | वेळपडल्यास शेतकऱ्यांना घरपोच खत, बियाणे - नरेंद्र नाईक

वेळपडल्यास शेतकऱ्यांना घरपोच खत, बियाणे - नरेंद्र नाईक

Next

-  ब्रह्मानंद जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आहे. सध्या हा काळ अत्यंत अडचणीचा असला तरी, खरीप हंगामाची तयारी सुरळीत सुरू आहे. खरीपातील सरासरी पिकांचे नियोजनही पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सर्व नियमांचे पालन करून पेरणीपूर्व कामे करावी. वेळपडल्यास शेतकºयांना घरपोच खत व बी-बियाणे पोहचविण्यात येतील, याबाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याशी साधलेला संवाद...


लॉकडाउनचा खत, बियाणे पुरवठ्यावर परिणाम होइल का?
लॉकडाउनमुळे खत व बियाणे पुरवठ्याबाबत काहीही परिणाम होणार नाही. खत निर्मितीचे सर्व युनिट सध्या सुरू ठेवण्यात आले आहेत. शेतकºयांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे उपलब्ध आहे. बियाण्याप्रमाणेच आवश्यक असलेल्या खतांच्या पुरवठ्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे.


उत्पादन वाढीसाठी काय नियोजन आहे?
गटशेतीच्या माध्यमातून उत्पन्नाचे लक्ष गाठू शकतो. गेल्या काही वर्षात ज्या भागात उत्पादन कमी झाले, अशी कमी उत्पादकता असलेली गावे निवडली आहेत. सोयाबीन, कापूस याप्रकारे जो पेरा कमी आहे, याकडेही विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. शेती शाळेच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करून उत्पादन वाढीच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील.


लॉकडाउनमध्ये कृषी विभाग शेतकºयांशी जोडलेला आहे का?
खरीपाच्या पेरणीबाबात कुठलीही माहिती शेतकºयांना एसएमएसद्वारे पोहचविण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्येही कृषी विभाग शेतकºयांशी जोडलेला आहे. गावागावातील कृषी सेवा केंद्रावरून त्यांच्या संपर्कातील ग्राहकांना व त्या गावातील सर्वच शेतकºयांना खत, बियाण्याची घरपोच सेवा देता येईल.


पिकांचे नियोजन कसे आहे?
जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे नियोजन ७ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आले आहे. सोयाबीन पिकाचे नियोजन ३ लाख ७१ हजार हेक्टर, कापूस २ लाख १० हजार हेक्टर, मका २६ हजार हेक्टर, तूर ७८ हजार हेक्टर, मूग २० हजार हेक्टर, उडीद ३१ हजार ४०० हेक्टर व उर्वरीत क्षेत्रावर इतर पेरा राहणार आहे.


महाबिजचे नियोजन काय आहे?
महाबिजकडून बियाणे देण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. सोयाबीनचे २४ हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा महाबिजकडून होत आहे.
शेतकºयांना घरपोच सेवा देण्याची वेळ आल्यास तसे नियोजन करण्यात आले आहे. गावागावातील कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून खत, बियाणे पुरवठ्याबाबत अंमलबजावणी करता येईल. शेतकºयांना खरीप हंगामातील पेरणीसाठी कुठलीही अडचण येणार नाही.

Web Title: If needed, fertilizers, seeds home delivery to farmers - Narendra Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.