ओबीसींना आरक्षण न दिल्यास कायदा हातात घेऊ -विजयराज शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:22 AM2021-06-27T04:22:34+5:302021-06-27T04:22:34+5:30
बुलडाणा : ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नसून येणाऱ्या काळात ही ...
बुलडाणा : ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नसून येणाऱ्या काळात ही मागणी पूर्ण न झाल्यास कायदाही हातात घेऊ व राज्य सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडू, असा इशारा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी यावेळी राज्य सरकारला दिला़
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले आहे, राज्य सरकारच्या या नाकर्तेपणा विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने २६ जून २०२१ रोजी बुलडाणा शहरातील स्थानिक त्रिशरण चौकात राष्ट्रीय महामार्गावर प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात "रास्ता रोको" आंदोलन करण्यात आले.
रास्ता रोकोमध्ये भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. सुनील देशमुख, ओबीसी मोचा तालुकाध्यक्ष अनिल जाधव, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सिंधूताई खेडेकर यांच्यासह अनेक नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला.
बुलडाणा-मलकापूर-चिखली-खामगाव या राष्ट्रीय महामार्गावरील रास्ता रोकोमुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी ओबीसी के सन्मान मे भाजपा मैदान मे, आघाडी सरकारच्या निषेध असो, राजकीय खेळी ओबीसी आरक्षणाचा बळी अशा घाेषणा देण्यात आल्या़ पाेलिसांनी आंदाेलकांना ताब्यात घेतले़ यावेळी महिला आंदोलकांनीसुद्धा पोलीस स्टेशन आवारात आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारचा व आंदोलन दडपू पाहणाऱ्या पोलीस यंत्रणेचा निषेध व्यक्त केला. या रास्ता रोको आंदोलनात किसान मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक वारे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम लाखोटिया, भाजपाचे तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे, विधी आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. मोहन पवार,यु वा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस अलका पाठक, महिला तालुकाध्यक्ष माया पदमने, शोभाताई ढवळे, उषा पवार, वैशाली जाधव, उमा निशाळे, विनायक भाग्यवंत, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, पं. स. सदस्य संदीप उगले, नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर, वैभव इंगळे, दत्ता पाटील, माजी तालुकाध्यक्ष सखाराम नरोटे, गौरव राठोड, गणेश देहाडराय, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष सुभाष जगताप, अशोक बाहेकर, ॲड. दशरथसिंग राजपूत, सतीश पाटील, प्रदीप तोटे, राजू अपार आदींसह भाजपा आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते व ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.