टीव्हीसमाेर बसून जेवत असाल तर सावधान, पाेटविकार वाढण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:12+5:302021-06-17T04:24:12+5:30
बुलडाणा : कोरोना महामारी काळात आबालबृद्धांपासून सर्व घरीच होते. त्यामुळे मुलांना मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईल किंवा टीव्ही होते. त्यातच ...
बुलडाणा : कोरोना महामारी काळात आबालबृद्धांपासून सर्व घरीच होते. त्यामुळे मुलांना मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईल किंवा टीव्ही होते. त्यातच टीव्हीसमोर बसून मुले जेवत असल्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र या सवयीमुळे मुलांमध्ये पोटविकार वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केळी आहे. पालकांनी याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
कोरोना काळात अनेक सवयींमध्ये बदल दिसून आला आहे. यात बच्चे कंपनीही मागे नाही. अशा परिस्थितीत मुलांना करमणूक किंवा मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईल, लॅपटॉपवर खेळण्याचे किंवा टीव्ही पाहण्याचा कालावधी वाढला. टीव्हीसमोर बसूनच जेवण्याची सवयसुद्धा लागली आहे. घरच्या घरीच असल्याने आई किंवा बाबांकडे फास्टफूड घेऊन मागायचा हट्टही केला जातो. तो पदार्थही टीव्हीसमोर बसूनच बच्चेकंपनी खात असतात. त्यामुळे त्यांना विकार जडण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तिखट मसाले किंवा तेलकट पदार्थाने मुलांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याकडे पाल्यांनी जागरूक राहून लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.
पाेटविकाराची प्रमुख कारणे
लहान सहान कारणांवरून पोटविकार होत असतात. परंतु गत पंधरा महिन्यांपासून घरीच राहून बच्चे कंपनीच्या अनेक सवयी बदलल्या आहेत. टीव्हीसमोर बसून जेवण करणे किंया अन्य पदार्थ खात असतील तर पोटविकार वाढेल. मानसिकरीत्या चिंता किंवा तिखट मसाले, पदार्थ ही पोटविकाराची प्ररख कारणे आहेत. चावून चावून न खाणे हेसुद्धा पाेटविकाराचे कारण असू शकते़
‘पोटविकार टाळायचे तर लहात मुलांची सवय आपल्याला बदलता येते. पोटविकाराच्या बाबतीत दुर्लक्ष करता कामा नये. कारण पोटाचे दुखणे मुलांसाठी कधी कधी गंभीर बनू शकते.
‘पोटविकार टाळायचे असतील तर मुलांना सात्त्विक आहार द्या. अति तिखट व जास्त तेलकट पदार्थ नसावेत. सलादचा प्रयोग करावा, त्यामुळे मुलांची पचनक्रिया सहजपणे होईल.
मुले जेवत नाहीत म्हणून टीव्ही
अनेक वेळा मुले जेवण करीत नाहीत़ त्यामुळे त्यांना टीव्ही पाहताना जेवण देते़ मुले चार ते पाच तास टीव्ही पाहतात़ टीव्हीसमाेर बसूनच जेवण करीत असल्याने चिंता वाढली़
काेमल भाग्यवंत, गृहिणी
मुलांनी हट्ट केला की ते सहसा माघार घेत नाही़ त्यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी टीव्ही सुरू ठेवावा लागताे़ जेवतानाही माझा मुलगा टीव्ही बघताे़ टीव्ही बंद केली तर ताे जेवणच करीत नाही़
सुहाना शर्मा, गृहिणी
मुले जेवत नाही म्हणून त्यांना थाेडा वेळ टीव्ही लावून देते़ त्यानंतर मी स्वत: त्यांच्याबराेबर वेळ घालवते़ घरगुती खेळांद्वारे त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करते़
माधुरी फाटे, गृहिणी
तिखट मसाल्यांचा वापर, चिंता, व जेवताना घाई करणे ही पोटविकाराची प्रमुख कारणे आहेत. यावर पालकांनी लक्ष द्यायला हवे़ बालकांनी मैदानी खेळांकडेही लक्ष द्यायला हवे़ आहाराकडे लक्ष दिल्यास पाेटविकार हाेण्याचा धाेका कमी असताे़
- डॉ. नितीन तडस, शल्य चिकित्सक
काेराेनामुळे लहान मुले घरातच असतात़ त्यामुळे, ते टीव्ही, माेबाईल पाहतात़ तसेच जंक फूडचे सेवन करतात़ त्यामुळे, मुलांना पाेटविकार तर हाेतातच त्याबराेबरच स्थूलपणाही वाढतो. त्यामुळे पालकांनी या बाबींकडे लक्ष देऊन त्यांना मैदानी खेळ खेळण्याकडे प्राेत्साहित करावे़
- डॉ. विनाेद जाधव, बालराेगतज्ज्ञ
बालकांना एखादी गाेष्ट हवीहवीशी वाटते़ तसेच टीव्हीबाबतही आहे़ माेबाईल, टीव्ही बघणे हे बालकांचे नवीन व्यसनच बनले आहे़ त्यामुळे त्यापासून मुलांना परावृत्त करणे गरजेचे आहे़ जेवणात सात्त्विक आहाराचा प्रयाेग करावा़
डाॅ़ जयदीप वाघ, बालराेगतज्ज्ञ