लॉकडाऊन टाळायचे असले तर सतर्कता बाळगा : प्रतापराव जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:39 AM2021-02-20T05:39:32+5:302021-02-20T05:39:32+5:30
जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी कोरोनाच्या बाबतीत असलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. गेल्या तीन ते चार दिवसात झपाट्याने पॉझिटिव्ह ...
जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी कोरोनाच्या बाबतीत असलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक आहे. गेल्या तीन ते चार दिवसात झपाट्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. २०० आणि त्यापेक्षा अधिक आकडा पॉझिटिव्ह रुग्णांचा येत असून आजही तब्बल २७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. काही रुग्णांचे मृत्यूदेखील होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खा. जाधव यांनी हे आवाहन केले आहे. लगतच्या जिल्ह्यात स्थिती गंभीर होत आहे. त्यातच बुलडाण्यातही जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. शासनाने अधिक सजगतेची भूमिका घेतली आहे. त्यामुळे प्रत्येकाने वैयक्तिक तथा कौटुंबिक पातळीवर काळजी घेण्याचे आवाहनही खा. जाधव यांनी केले आहे. मधल्या काळात काही व्यवहार सुरू झाले. निर्बंध शिथिल झाले. त्यामुळे तरुण वर्गही अकारण बाहेर पडत आहे. अद्याप कोरोना संपलेला नाही. त्यामुळे मास्क वापरा, गर्दी टाळा व नियमित हात स्वच्छ धुवा या त्रिसूत्रींचे सर्वांनी पालन करण्याचे आवाहन खा. जाधव यांनी केले आहे.