कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:35 AM2021-04-04T04:35:32+5:302021-04-04T04:35:32+5:30
बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येत सातत्याने भर पडत आहे. शहर आणि परिसरात दररोज शंभरावर नागरिक कोरोनाबाधित येत आहेत. ...
बुलडाणा : कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णसंख्येत सातत्याने भर पडत आहे. शहर आणि परिसरात दररोज शंभरावर नागरिक कोरोनाबाधित येत आहेत. मात्र, तरी देखील बाजारपेठेत नागरिक कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
----
प्रशासकांच्या नियुक्त्या रखडल्या
बुलडाणा: जिल्ह्यातील खामगाव, सिंदखेडराजा, संग्रामपूर आणि जळगाव जामोद या चार कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अशासकीय प्रशासक मंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. राजकीय वर्चस्वाच्या लढाईतून या नियुक्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
---
लोकशाही दिन ऑनलाइन पद्धतीने
बुलडाणा: कोरोना विषाणू संसर्गामुळे सोमवार ५ एप्रिल रोजी ऑनलाइन पद्धतीने लोकशाही दिन आयोजित केला आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रारी व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----
इंगळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
मोताळा: खामगाव येथील भंगार व्यावसायिक इंगळे कुटुंबीयांवर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा कुणबी समाज मंचच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या संदर्भात विपुल गावंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
---
सोयाबीन बियाणे विक्रीत अडसर
बुलडाणा: हंगामात सोयाबीन बियाणे विक्री करणे अशक्य होते. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती कार्यालयाने सोयाबीन विक्रीचा काढलेला आदेश रद्द करण्याची मागणी अमित कोचर, सुनील देशमुख, श्रीकिसन पुरवार यांनी केली आहे.
---
बाबासाहेबांच्या स्मारकासाठी जागा द्या
बुलडाणा: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी हिरोळे पंपाजवळील जागा द्यावी, अशी मागणी बुलडाणा येथील विविध संघटनांनी केली आहे. या संदर्भात अ.भा. गुरुरविदास समता परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
---------
तरोडा येथे कोविड लसीकरण
मोताळा: तालुक्याती तरोडा येथे १ एप्रिल रोजी कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती प्रकाश बस्सी, सरपंच अनिता धीरबस्सी यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
---
विद्युत खांबावरील तारचोरी
मेरा: येथून जवळच असलेल्या गुंजाळा गावातील विद्युत खांबावरील तार चोरीला जात आहे. त्यामुळे गावातील मागासवर्गीय वस्तीतील वीजपुरवठा खंडित होत आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
--
गुरांचे लसीकरण शिबिर
मोताळा: तालुक्यातील माकोडी येथे गुरांचे लसीकरण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात पशुपालकांना गुरांच्या विविध आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात २३ गुरांची तपासणी करण्यात आल्याचे समजते.
----
लिहा बु. झाडे सुकण्याच्या मार्गावर
मोताळा: तालुक्यातील पिंपळगाव देवी ते लिहा बु. रस्त्यावरील सामाजिक वनीकरणाच्या झाडांना पाणीच दिले जात नाही. त्यामुळे या मार्गावरील झाडे सुकण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.
----------