मातृतीर्थ विकास आराखड्याकडे दुर्लक्ष

By admin | Published: August 21, 2015 11:34 PM2015-08-21T23:34:30+5:302015-08-21T23:34:30+5:30

सिंदखेडराजा येथे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांचा आरोप.

Ignore the Mother Earth Development Plan | मातृतीर्थ विकास आराखड्याकडे दुर्लक्ष

मातृतीर्थ विकास आराखड्याकडे दुर्लक्ष

Next

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या ऐतिहासिक पर्यटनस्थळाचा शेगाव व मोझरीच्या धर्तीवर विकास व्हावा, यासाठी माजी गृहमंत्री अजित पवार यांनी १२ जून २0१३ रोजी येथील २५0 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिली होती. मातृतीर्थ विकास आराखड्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांनी केला. ते स्थानिक विश्रामगृहावर २१ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अँड. नाझेर काझी पुढे म्हणाले की, सिंदखेडराजा विकास आराखडा मंजूर होऊन दोन वर्षे लोटली. ३ जुलै २0१३ रोजी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर निखिल सहस्त्रबुद्धे यांच्या नागपूर स्थित क्रिएटिव्ह सर्कल या कंपनीला ऑक्टोबर २0१४ मध्ये प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर १२ जानेवारी २0१५ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो शिवभक्तांच्या साक्षीने विकास आराखड्यासाठी २५0 कोटी रुपये त्वरित देण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून आजपर्यंत क्रिएटिव्ह सर्कलची एकही जबाबदार व्यक्ती येथे आली नाही. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडून शेगावच्या विकासासाठी ३६0 कोटी रुपयांची मागणी लावून धरली होती. त्याच संदर्भात २२ ऑगस्ट रोजी शेगाव येथे अर्थमंत्री सुधीर मुनगट्टीवार हे बैठकीसाठी येणार असून, शेगाव विकास आराखड्यासाठी निधीची घोषणा करणार आहेत; परंतु या आराखडा बैठकीमध्ये मुनगंटीवार यांनी मातृतीर्थ जिजाऊ माँसाहेबांच्या २५0 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचाही आढावा घ्यावा, असेही अँड. नाझेर काझी पत्रकार परिषदेत म्हणाले. नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष देविदास ठाकरे, पंचायत समिती सभापती विठ्ठलराव ईलग, भगवान सातपुते, सरपंच एस.के.खरात यावेळी उपस्थित होते

Web Title: Ignore the Mother Earth Development Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.