सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष

By admin | Published: September 11, 2014 12:25 AM2014-09-11T00:25:46+5:302014-09-11T00:25:46+5:30

मातृतिर्थ राजवाड्यातील भुयारीमार्गात अंधाराचे साम्राज्य.

Ignoring the historical tourist spot in Sindh Kheda | सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष

सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष

Next

काशिनाथ मेहेत्रे / सिंदखेडराजा
महाराष्ट्राची अस्मीता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांच्या जन्मामुळे मातृतिर्थ सिंदखेडराजा नगरीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे. मात्र ऐतिहासिक पर्यटनस्थळांचे व्यवस्थापन राखण्यात प्रशासन यंत्रणा तोकडी पडत आहे. राजवाड्यातील भुयारी मार्गात उजेडासाठी दिव्याची व्यवस्था नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
पुर्वी शत्रुने चढाई केल्यास त्यांना परतून लावण्यासाठी राजवाड्यामध्ये भुयारी मार्ग असत. असाच भुयारीमार्ग सिंदखेड येथील ऐतिहासिक राजवाड्यात असून त्यामार्गाने आडगावराजा, देऊळगावराजा, किनगावराजा व मेव्हुनाराजा येथे जाता येत असल्याचे सांगीतले जाते. मात्र या भुयारी मार्गात उजेडासाठी लाईटची व्यवस्था नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. तरी भुयारी मार्गाच्या ठिकाणी लाईटची व्यवस्था करावी, अशी पर्यटकांची मागणी आहे.

Web Title: Ignoring the historical tourist spot in Sindh Kheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.