भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:35 AM2021-01-23T04:35:26+5:302021-01-23T04:35:26+5:30
कुत्रे पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अभाव इतर जिल्ह्यातील शहरांमध्ये भटके कुत्रे पकडण्यासाठी पालिका किंवा महानगरपालिका स्तरावर विशेष पथके आहेत. कुत्रे पकडणाऱ्या ...
कुत्रे पकडण्यासाठी कर्मचाऱ्यांचा अभाव
इतर जिल्ह्यातील शहरांमध्ये भटके कुत्रे पकडण्यासाठी पालिका किंवा महानगरपालिका स्तरावर विशेष पथके आहेत. कुत्रे पकडणाऱ्या या कर्मचाऱ्यांकडून शहरात अंमलबजावणी करण्यात येते. मात्र, बुलडाणा नगरपालिकेकडे असे स्वतंत्र पथक नाही. त्यामुळे स्वच्छता विभागाचे कर्मचारी कुत्रे कसे पकडणार, असा मोठा प्रश्न आहे.
मोकाट कुत्रे पकडून शहर हद्दीबाहेर सोडण्यात येतात. कुत्र्यांची नसबंदी हा नगरपालिकेचा विषय नाही. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाला यापूर्वीही माहिती दिली आहे. पशुसंवर्धन विभागाने सहकार्य केले तर दोन्ही विभाग मिळून कुत्र्यांच्या नसबंदीची अंमलबजावणी करता येऊ शकते.
सुनील बेंडवाल, आरोग्य निरीक्षक, नगरपालिका बुलडाणा.
तक्रारी करण्याकडे दुर्लक्ष
भटक्या कुत्र्यांसंदर्भात अनेक नागरिक त्रस्त आहेत. परंतु नगरपालिकेकडे तक्रार करण्यास कुणीही समोर येत नाही. भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला तरी, लेखी तक्रार न करता तोंडी माहिती दिली जाते. त्यामुळे प्रशासनाकडूनही अंमलबजावणी होत नाही.
७५० रुपये खर्च येतो एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी
० कंपन्यांना दिले आहे, प्रशासनाने कंत्राट