खामगावात अवैध बायोडिझलची विक्री, ट्रकचालकासह दोघांना रंगेहात पकडले; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By अनिल गवई | Published: June 8, 2023 03:40 PM2023-06-08T15:40:52+5:302023-06-08T15:46:12+5:30

या कारवाईमुळे अवैध बायोडिझल माफीयांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे दिसून येते.

Illegal biodiesel sale in Khamgaon, truck driver and two caught red-handed; 21 lakhs worth seized | खामगावात अवैध बायोडिझलची विक्री, ट्रकचालकासह दोघांना रंगेहात पकडले; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगावात अवैध बायोडिझलची विक्री, ट्रकचालकासह दोघांना रंगेहात पकडले; २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

googlenewsNext


खामगाव: येथून जवळच असलेल्या सजनपुरी येथे अवैध बायोडिझलची खरेदी व िवक्री करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. यात ट्रकसह इतर साहित्य असा एकुण २१ लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध बायोडिझल माफीयांचे धाबे चांगलेच दणाणल्याचे दिसून येते.

याबाबत सविस्तर असे की, खामगाव शहरापासून जवळच असलेल्या सजनपुरी येथे अवैध बायोडिझलची खरेदी आणि विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी पथक आणि पुरवठा अधिकार्यांनी छापा मारला असता रशीद खान लियाकत खान ४० रा. मिल्लत कॉलनी हा ट्रक चालक शेख नदीम शेख लुकमान बागवान २७ रा चिखली यांच्या ट्रक एमएच ३० एबी ३८५५ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये अवैध बायो डीझेल भरत असताना रंगेहात आढळून आला. यावेळी घटनास्थळी २००० लिटर अवैध बायोडिझल, एमएच ३० एबी ३८५५ क्रमांकाचा ट्रक, मालवाहू वाहन, टाक्या मशीन ,पाईप, जनरेटर, व इतर साहित्य असा एकूण २१ लाख रुपयाचा साठा जप्त केला. दोघांना ताब्यात घेऊन एसडीपीओ पथकाने सर्व साहित्य ग्रामीण पोलीस स्टेशनला जमा केले आहे. या कारवाईमुळे खामगाव शहरातील अवैध बायोडिझल माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
 

Web Title: Illegal biodiesel sale in Khamgaon, truck driver and two caught red-handed; 21 lakhs worth seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.