खामगावात अवैध बांधकाम; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:11 PM2020-06-17T12:11:26+5:302020-06-17T12:11:54+5:30
नगर पालिकेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात खामगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : लॉकडाऊन कालावधीत नगर पालिकेची परवानगी न घेता, अवैध बांधकाम केल्याप्रकरणी नगर पालिकेच्या तक्रारीवरून दोघांविरोधात खामगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर पालिकेच्या पवानगी विना अवैधरित्या कॉम्पलेक्सचे बांधकाम केल्या प्रकरणी डॉ.सदानंद इंगळे व नंदु दुबे या दोघांविरुध्द १६ जून रोजी शहर पोस्टेमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत स्थानिक नगर पालिकेचे नगर रचनाकार अनुराग विनय घिवे (सहाय्यक न.प.खामगाव) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, डॉ. सदानंद इंगळे यांनी जलंब नाक्यावर कॉम्प्लेक्सचे बांधकाम केले आहे. सिट नं.२२ वी नझुल प्लॉट१/२ मध्ये ३९३ चौ.मि. पालिकेच्या परवानगी विना बांधकाम केले.
बांधकाम सुरु असतांना डॉ. इंगळे यांना नगर पालिकेने बांधकाम थांबविण्याची नोटीसही दिली होती. त्यामुळे डॉ. सदानंद इंगळे यांच्यावर एमआरपीपी अॅक्टच्या कलम ५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
तसेच नंदकिशोर शिवलाल दुबे यांनी सुध्दा डिपीरोडवर प्लॉट नं.१ सर्वे नंबर ९६/२ वर २११३.०३ चौ.मि. बांधकाम केले. त्यांनाही बांधकाम थांबविण्याची सूचना नगर पालिकेने दिली होती. तरीही त्यांनी बांधकाम थांबविले नाही.
त्यामुळे नंदकिशोर दुबे विरुध्दही संदर्भीय कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नगर पालिकेने केलेल्या या कारवाईमुळे खामगाव शहरातील बांधकाम व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे तर अवैध बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.