वैद्यकीय कचऱ्याची नियमबाह्य विल्हेवाट; चार डॉक्टरांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 11:55 AM2021-08-14T11:55:38+5:302021-08-14T11:55:46+5:30
Illegal disposal of medical waste : डॉ. राहुल खंडारे यांचे द्वारका हॉस्पिटल, ट्युलिप हॉस्पिटल, डॉ. जाधव यांचे श्रीराम हॉस्पिटल, डॉ. मनीष पॉल यांच्या सियॉन हॉस्पिटलचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील डॉक्टरांकडून जैविक आणि वैद्यकीय कचऱ्याची नियमबाह्य पध्दतीने विल्हेवाट लावणाऱ्या चार डॉक्टरांना नगर पालिका प्रशासनाने नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी नोटीस बजावलेल्या हॉस्पिटलमध्ये खामगाव शहरातील डॉ. राहुल खंडारे यांचे द्वारका हॉस्पिटल, ट्युलिप हॉस्पिटल, डॉ. जाधव यांचे श्रीराम हॉस्पिटल, डॉ. मनीष पॉल यांच्या सियॉन हॉस्पिटलचा समावेश आहे. कोरोना काळातील जैविक आणि वैद्यकीय कचऱ्याची खुल्या जागेत तसेच नगर पालिकेच्या घंटागाडीत विल्हेवाट लावल्याबाबत नंदू भट्टड यांनी ३ मे २०२१ रोजी तक्रार केली. मात्र, कारवाईस विलंब होत असल्याने, त्यांनी १५ ऑगस्ट रोजी लाक्षणिक आंदोलनाचा इशारा दिला. तत्पूर्वीच १२ ऑगस्ट रोजी मुख्याधिकाऱ्यांनी चार हॉस्पिटलच्या संचालकांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचेही संबंधितांना अवगत करण्यात आले.