मुरूमाचे अवैध उत्खनन; योगायोग की सुनियोजित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 05:08 PM2020-12-04T17:08:17+5:302020-12-04T17:09:02+5:30

Khamgaon News अवैध गौण खनिज उत्खनन हा निव्वळ योगायोग की सुनियोजीत कट? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.

Illegal excavation is Planned of co-insidence | मुरूमाचे अवैध उत्खनन; योगायोग की सुनियोजित!

मुरूमाचे अवैध उत्खनन; योगायोग की सुनियोजित!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : तालुक्यातील रोहणा शेत शिवारातील एका शेतातून परवानगी शिवाय मोठ्याप्रमाणात मुरूम उत्खनन करण्यात आले. एकाच तलाठ्याच्या कर्तव्यावरील दोन साजामध्ये टप्प्या-टप्प्याने ‘जान्दू’ कंन्स्ट्रक्शन कंपनीकडून उत्खनन करण्यात आले. त्यामुळे ‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेले अवैध गौण खनिज उत्खनन हा निव्वळ योगायोग की सुनियोजीत कट? असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे.
खामगाव-बुलडाणा-अजिंठा राज्य महामार्गाचे बांधकाम करताना जान्दू कन्स्ट्रक्शन कंपनीकडून परिसरातील शेत शिवार आणि तलावात मोठ्याप्रमाणात अवैध उत्खनन केले जात आहे.  जान्दू कंपनीला राजकीय पदाधिकारी, महसूल मधील लहान-मोठे अधिकारी यांचे पाठबळ आहे. त्यामुळे ह्यजान्दूह्ण कंपनीची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असतानाच, रोहणा साजातील तत्कालीन  आणि कंझारा साजात सद्यस्थितीत कर्तव्यावर असलेल्या तलाठी शेळके यांची चांगलीच मदत असल्याचे दिसून येते. तलाठी दिनेश विठ्ठलराव शेळके यांच्यासोबतच मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदारही ‘जान्दू’वर मेहेरबान आहेत. 
 इतकेच नव्हे तर जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाºयांचीही ‘जान्दू’वर कृपादृष्टी आहे. कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडविणाºया ह्यजान्दूह्णला महसूल प्रशासनाकडून थातुरमातूर अवघ्या सव्वा लाखाचा दंड थोटावण्यात आला. 
त्यामुळे महसूल प्रशासनाच्या कारवाईबाबत संशय व्यक्त होत असल्याने उपविभागीय अधिकाºयांसह जिल्हाधिकाºयांनीही याप्रकरणी आता लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Illegal excavation is Planned of co-insidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.