रेतीचे अवैध उत्खनन वाढले
By admin | Published: October 2, 2014 11:52 PM2014-10-02T23:52:22+5:302014-10-02T23:52:22+5:30
रेती घाटांची मुदत संपली असतानाही अवैधरित्या उत्खनन.
लोणार (बुलडाणा) : मराठवाड्यातील देवठाणा, कानडी, इच्चा, दुधा येथे रेती घाटाच्या लिलावाची मुदत ३0 स प्टेंबर रोजी संपली आहे. तरीसुद्धा रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. मराठवाड्यातील देवठाणा, कानडी, इच्चा, दुधा, भुवन, बन, वझरआघाव, टाकळखोपा आदी ठिकाणच्या रेतीघाटाचा लिलाव नोव्हेंबर २0१३ मध्ये झाल्यावर वर्षभरात या रेतीघाटावरून नियम धाब्यावर ठेवून अंदाजे २ लाख बरास रेतीचे उत्खनन झाले.
रेतीघाट लिलावधारकांनी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला. क्षमतेपेक्षा जास्त रेतीचे उ त्खनन केल्यानंतरही महसूल प्रशासनाकडून या लिलावधारकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. याकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची मागणी गुलाबराव सरदार यांनी केली आहे.