अवैध गुटखा विक्री वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:39 AM2021-08-21T04:39:24+5:302021-08-21T04:39:24+5:30

बुलडाणा : संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असतानाही जिल्ह्यात सर्वत्र पानटपऱ्यांवर गुटखा मिळत असल्याचे चित्र बुलडाणा शहरात दिसून येत आहे. ...

Illegal gutka sales increased | अवैध गुटखा विक्री वाढली

अवैध गुटखा विक्री वाढली

Next

बुलडाणा : संपूर्ण राज्यात गुटखा बंदी असतानाही जिल्ह्यात सर्वत्र पानटपऱ्यांवर गुटखा मिळत असल्याचे चित्र बुलडाणा शहरात दिसून येत आहे. तेव्हा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरात गुटखाबंदीचा फज्जा उडाला असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे विकल्या जाणारा गुटखा हा चढ्या भावाने विकल्या जात असून, अनेक जण यामधून मालामाल होत असल्याचे दिसून येत आहे.

रस्त्यावर पार्किंग

बुलडाणा : बुलडाणा शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात आहेत. यासोबतच शहरातील प्रतिष्ठानासमोर कुठेही पार्किंग झोन उपलब्ध नसून, शहरात रस्त्यावरच पार्किंग केली जात आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तर दुसरीकडे क्षुल्लक कारणावरून वादही उद्भविण्याचे प्रसंग शहरात घडले आहेत. तेव्हा संबंधित विभागाने शहरातील पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद

धाड : बुलडाणा तालुक्यात मागील तीन ते चार दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावले आहेत. आता खरिपाच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार असल्याची शक्यता आहे. असे जरी असले तरी मात्र, अद्यापही नदी-नाले आणि प्रकल्प कोरडे असून, रब्बी हंगामाची शाश्वती धूसर आहे.

पाण्याचा अपव्यय

बुलडाणा : बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन जागोजागी फुटली असून, यामुळे लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे नगरपालिकेने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. असे झाल्यास शहरातील प्रत्येक नळधारकांना पाणी मिळण्यास मदत होणार आहे. तरी येत्या काही दिवसांत पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे.

Web Title: Illegal gutka sales increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.