अवैध वृक्षतोड वाहतूक करणारा ट्रक जप्त

By admin | Published: July 16, 2017 02:25 AM2017-07-16T02:25:52+5:302017-07-16T02:25:52+5:30

विनापरवाना वाहतूक करणार्‍या ट्रक जप्त करून कारवाई केल्याची घटना १५ जुलै रोजी धांदरवाडीजवळ करण्यात आली.

Illegal logging truck seized | अवैध वृक्षतोड वाहतूक करणारा ट्रक जप्त

अवैध वृक्षतोड वाहतूक करणारा ट्रक जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : अवैधरित्या आंब्याची झाडे तोडून विनापरवाना वाहतूक करणार्‍या ट्रक जप्त करून कारवाई केल्याची घटना १५ जुलै रोजी धांदरवाडीजवळ करण्यात आली.
गेल्या दीड महिन्यापासून गारखेड परिसरातील आंब्याची मोठ-मोठी झाडे अवैधरित्या तोडून विना परवाना वाहतूक करणार्‍या औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील चांद कडू बेग रा. नायगाव यांचा एम.एच.१९-झेड २३५६ क्रमांकाच्या ट्रकवर धांदरवाडी जवळ वनरक्षक गणेश मिसाळ यांनी आज कार्यवाही करुन ट्रक जप्त केला. तर बुलडाणा येथे सागाच्या वृक्षाची अवैध वाहतूक करणार्‍या दोन गाढवांना वनविभागाने पकडले असून सदर गाढव व ट्रक काळा पाणी नर्सरीत जमा करण्यात आले आहे. वृक्षतोड करण्यासाठी वनविभागाकडून रीतसर परवानगी घ्यावी लागते. परंतु वृक्षतोड व वाहतूक परवाना घेण्यासाठी परवाना पद्धत किचकट व सहजासहज मिळत नसल्यामुळे वृक्षतोड माफीया अवैध मार्गाचा अवलंब करतात. गेल्या दीड महिन्यापासून गारखेड परिसरातील खाजगी मालकीची विना परवाना कत्तल केलेली आंब्याची झाडे ट्रकमध्ये भरुन वरुन ताडपत्रीने झाकून विना परवाना वाहतूक करताना पकडली व सदर ट्रक काळा पाणी नर्सरीत जप्त करण्यात आला. त्या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दंड आकारण्यात येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सोळुंके यांनी दिली तर सदर गुन्हा रिपोर्ट नुसार ६२३/९ नुसार कार्यवाही करण्यात आली.

Web Title: Illegal logging truck seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.